आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवंगत सतारवादक पंडीत रविशंकर यांच्या कन्येने घेतला घटस्फोट, सात वर्षानंतर घेतला काडीमोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत सतारवादक पंडीत रवीशंकर यांची कन्या आणि सतारवादक अनुष्का शंकरने लग्नाच्या सात वर्षानंतर पतीपासून काडीमोड घेतला आहे. अनुष्का तिचा पती जो राईटपासून आता वेगळी झाली आहे. दोघांनी प्रेमविवाह केला होता. 2009 साली अनुष्का आणि जो यांची भेट दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्यानंतर हे दोघे सतत भेटत राहिले आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होऊ लागली. रिलेशनशीपच्या तीन महिन्यातच दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि  २६ सप्टेंबर २०१० रोजी त्यांनी लग्नही केले. 

 

जो राईट हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने ‘प्राईड अॅण्ड प्रेज्युडाईस’, ‘इंडियन समर’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अनुष्काचा जन्म लंडनमध्ये झाला आहे आणि तिचे बालपणही अमेरिका, यूके आणि भारत या तीन देशांत गेले आहे. जो आणि अनुष्का यांना जुबीन आणि मोहन ही दोन मुले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अनुष्का आणि जो यांच्या लग्नाचे आणि इतर काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...