आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुई धागा' चा फर्स्ट लूक आला समोर, या अंदाजात दिसले वरुण-अनुष्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुण धवन आणि अनुष्का शर्मा 'सुई-धागा' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची शुटिंग सुरु झाली आहे. शरत कटारिया हे 'सुई-धागा' चित्रपटाचे डायरेक्टर आहेत. तर आदित्य चोप्रा आणि मनीष शर्मा प्रोड्यूसर आहेत. या चित्रपटातील वरुण आणि अनुष्काचा फर्स्ट लुक समोर आलाय. यामध्ये वरुण धवन आणि अनुष्का शर्मा खुपच साध्या लूकमध्ये दिसताय. या लूकमध्ये दोघांना ओळखणेही अवघड आहे. 

 

- हा चित्रपट अशा दोन व्यक्तीची कथा आहे, जे आपल्या बळावर सर्वकाही करु शकतात. हा चित्रपट सप्टेंबर 2018 मध्ये रिलीज होणार आहे. 
- यापुर्वी अनुष्काचा एक फोटो समोर आला होता. यामध्ये अनुष्का शिवणकाम करताना दिसली होती. यासाठी तिने वर्कशॉप घेणेही सुरु केलेय. यासोबतच चित्रपटासंबंधीत अजून एक फोटो समोर आलाय. यामध्ये अनुष्का सिंपल कॉटनच्या ब्लू रंगाच्या साडीमध्ये दिसली होती. यामध्ये ती विना मेकअप दिसतेय. चित्रपटात अनुष्का वरुणसोबत लीड रोल प्ले करतेय. वरुण धवनचाही एक फोटो समोर आला होता. यामध्ये तो शिलाई मशीन चालवताना दिसला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...