आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्यादानाच्या वेळी वडील तर पाठवणीच्या वेळी अनुष्का झाली भावूक, बघा लग्नाचे खास VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


क्यूट कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली इटलीत विवाहबंधनात अडकले अगदी मोजक्या नातेवाकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. डेस्टिनेशन वेडिंगसाठी दोघांनी इटलीतील टस्कनीस्थित बोर्गो फिनोसिएतो रिसॉर्टची निवड केली.  याच ठिकाणी त्यांचा साखरपुडा, मेंदी, हळदी आणि लग्नसमारंभ असे सगळे विधी पार पडले.  या दोघांच्या लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर चर्चेत आहेत. #virushkaKiShadi #viruksha #viranushka हे हॅशटॅगही ट्रेंड होत आहेत. 


विराट-अनुष्का यांच्या साखरपुडा, हळदी, मेंदीच्या व्हिडिओसोबतच वरमाला आणि अनुष्काच्या पाठवणीचा व्हिडिओ समोर आला आहे.  अनुष्काच्या पाठवणीचा व्हिडिओत ती भावूक झालेली दिसत आहे.‘दिन शगना दा चढेया…’ हे गाणे सुरु असतानाच अनुष्काची पाठवणी होत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तर कन्यादानाच्या विधीवेळी अनुष्काचे वडील भावूक झालेले दिसत आहेत.  


या पॅकेजमधून बघुयात, अनुष्का-विराट यांच्या लग्नसोहळ्यातील व्हिडिओसोबतच लग्नसोहळ्याचे काही नवीन फोटोज..  

बातम्या आणखी आहेत...