आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटण्याच्या मार्गावर होती अनुष्का-विराटची जोडी, सलमान खानने वाचवली रिलेशनशिप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा, विराट कोहली इन्सेटमध्ये सलमान खान. - Divya Marathi
अनुष्का शर्मा, विराट कोहली इन्सेटमध्ये सलमान खान.

बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या लग्नाच्या चर्चेने सध्या जोर पकडला आहे. अशी माहिती आहे की हे दोघे इटलीतील मिलान सिटीमध्ये लग्न करणार आहेत. गेल्या 4 वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहे. या चार वर्षांमध्ये यांच्या संबंधात अनेक चढ-उतार देखील आले होते. एक वेळ तर अशी आली होती, की यांचे रिलेशन तुटते की काय, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र ऐनवळी बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याने मध्यस्थी केली आणि सर्वकाही सुरळीत झाले. 

 

सलमानने तुटता-तुटता वाचवली रिलेशनशिप 
- अनुष्का आणि विराट यांच्यात बेबनाव झाला होता आणि यांची रिलेशनशिप तुटण्याच्या मार्गावर होती. तेव्हा सलमानने त्यांच्यात पॅचअप करुन दिला होता. 
- दोघे सलमानच्या घरी गेले होते. तिथे सलमानने दोघांची मनमोकळ्या गप्पा केल्या आणि त्यांची एमकेसंबंधीची नाराजी दूर केली. 
- अशी माहिती आहे, की विराट-अनुष्का यांचे लग्न इटलीमध्ये होणार आहे. ज्या ठिकाणी हे लग्न होणार आहे ते ठिकाण फक्त उन्हाळ्यातच सर्वांसाठी खुले केले जाते. 
- मात्र या दोघांच्या लग्नासाठी डिसेंबरमध्ये हे ठिकाण उघडले जाणार आहे. या लोकेशनच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
- दिवसा वेडिंग सेरेमनी होईल आणि सायंकाळी पार्टी होणार असल्याची माहिती आहे. 

बातम्या आणखी आहेत...