आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच्या लग्नाचे शाहरुख-आमिरला निमंत्रण, सलमानला टाळले; या तारखेला मुंबईत रिसेप्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा, आमिर खान, शाहरुख खान आणि  सलमान खान. - Divya Marathi
अनुष्का शर्मा, आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान.

बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशी माहिती आहे की विराट-अनुष्का 12 डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. आतापर्यंत अशी माहिती आहे, की अनुष्काच्या फॅमिलीने त्यांच्या शेजाऱ्यांना लग्नाला इन्व्हाइट केले आहे. ताज्या माहितीनुसार, या लग्नासाठी अनुष्काने बॉलिवूड सेलेब्सना निमंत्रित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनुष्कान आमिर खान आणि शाहरुख खान यांना निमंत्रण दिले आहे, मात्र सलमान खानला इन्व्हिटेशन दिलेले नाही. याशिवाय  रणबीर कपूर, कतरिना कैफ, करण जोहर, आदित्य चोपडा, डायरेक्टर मुनीश शर्मा यांना निमंत्रित केले आहे. दुसरीकडे विराटने सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, कोच राजकुमार शर्मा यांच्यासह चाइल्डहूड फ्रेंड्सला इन्व्हाइट केले आहे. 

 

फॅमिली इटलीला रवाना 
- अनुष्का शर्मा आणि तिची फॅमिली इटलीला गुरुवारीच रवाना झाले आहे. एअरपोर्टवर अनुष्काच्या फॅमिलीसोबत अनंत धाम आत्माधाम हरिद्वार येथील महाराज अनंत बाबा देखील दिसले होते. हे तेच पंडित आहे जे गेल्यावर्षी उत्तराखंडमध्ये अनुष्का - विराट यांच्या भेटीवेळी दिसले होते. 
- विराट-अनुष्का हे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे नाते तुटले अशाही बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. त्यानंतर लागलीच ते दोघे एकत्र दिसले आणि सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. 

 

21 डिसेंबरला मुंबई होणार रिसेप्शन 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, इटलीतील मिलान शहरात अनुष्का-विराटचे लग्न होणार आहे. त्यांच्या फॅमिलीने वेडिंग वेन्यू देखील बूक केले आहे. 
- अनुष्का-विराटचे लग्न हा एक खासगी सोहळा असणार आहे. यामध्ये फॅमिली मेंबर्ससह काही क्लोज फ्रेंडस यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे. 
- अनुष्का-विराटच्या क्लोज फ्रेंड्सने दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन 21 डिसेंबरला मुंबईत होण्याची शक्यता आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, असे सेलेब्स ज्यांना अनुष्का-विराटच्या लग्नाचे निमंत्रण आहे... 

बातम्या आणखी आहेत...