आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनिमूननंतर कामवर परतली अनुष्का शर्मा, झिरोच्या सेटवर SRK ने असे केले वेलकम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लग्नानंतर अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा कामवर परतली आहे. अनुष्काने तिची अपकमिंग फिल्म 'झिरो'ची शुटिंग सुरु केली आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरुन तिची एक्साइटमेंट स्पष्ट जाणवते. फोटो शेअर करताना त्यासोबत अनुष्काने लिहिले आहे,“They say - Back to one! In this case ill say - Back to Zero!! Happy to be back on the film and back to work with my lovely co actors and crew !! Thank you for the beautifully decorated floral van,” 

 

शाहरुखनेही केले वेलकम 
- अनुष्का कामावर परत आल्यानंतर तिचा को-स्टार शाहरुख खानने फुलांचा बुके देऊन तिचे स्वागत केले. एवढेच नाही तर क्रु मेंबर्सनेही तिच्या व्हॅनिटी व्हॅनला फुलांनी सजवून तिला वेल-कम केले. 
- 11 डिसेंबरला अनुष्काचे क्रिकेटर विराट कोहलीसोबत इटलीत डेस्टिनेशन वेडिंग झाले. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शन झाल्यानंतर हे कपल सध्या केपटाऊनमध्ये होते. 
- विराट अजूनही तिथेच आहे. तो साऊथ आफ्रिकेत दोन महिने राहाणार आहे. येथे साऊथ आफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यात तीन टेस्ट, 6 वनडे आणि तीन टी-20 सामने होणार आहेत. 
- अनुष्काचे इंडियामध्ये प्रोफेशनल कमिटमेंट्स आहेत, त्यामुळे ती मुंबईत परतली आहे. 
- झिरो या सिनेमात अनुष्कासोबत शाहरुख खान आणि कतरीना कैफ आहेत. या फिल्ममध्ये शाहरुख बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अनुष्काचे काही फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...