आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का शंकरने मुलाच्या वाढदिवशी स्तनपान करतानाचा फोटो केला शेअर, नुकताच घेतलाय घटस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंडीत रवीशंकर यांची मुलगी आणि सतारवादक अनुष्का शंकरने तिच्या मुलाच्या वाढदिवशी मुलाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तिने एक लांबलचक पोस्टही लिहीली आहे. तिने लिहीले, "बरोबर तीन वर्षापूर्वी मी दुसऱ्यांदा आई झाले होते. पण आज केवळ माझ्या मुलाचा वाढदिवस नव्हे तर आई बनण्याची माझ्या आयुष्याची प्रोसेसही मला आठवत आहे. इतक्या छोट्या जीवाला मी माझ्या आत वाढवत होते. या सर्व प्रोसेसदरम्यान मी आता इतकी मजबुत झाले आहे की आयुष्यातील कोणच्याही वादळाला हसत तोंड देऊ शकते. त्यामुळे आज मी केवळ त्याचा नाही तर माझ्यातील एका मजबुत व्यक्तीचाही वाढदिवस साजरा करणार आहे. यासोबतच अनुष्काने तिच्या गर्भारपणाच्या काळातील काही फोटोही शेअर केले आहेत."


अनुष्का पती जो राईटपासून झाली आहे विभक्त..
दिवंगत सतारवादक पंडीत रवीशंकर यांची कन्या आणि सतारवादक अनुष्का शंकरने लग्नाच्या सात वर्षानंतर पतीपासून नुकताच काडीमोड घेतला आहे. अनुष्का तिचा पती जो राईटपासून आता वेगळी झाली आहे. दोघांनी प्रेमविवाह केला होता. 2009 साली अनुष्का आणि जो यांची भेट दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्यानंतर हे दोघे सतत भेटत राहिले आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होऊ लागली. रिलेशनशीपच्या तीन महिन्यातच दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि २६ सप्टेंबर २०१० रोजी त्यांनी लग्नही केले.

 

अनुष्काचा एक्स पती आहे हॉलिवूड दिग्दर्शक...
जो राईट हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने ‘प्राईड अॅण्ड प्रेज्युडाईस’, ‘इंडियन समर’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अनुष्काचा जन्म लंडनमध्ये झाला आहे आणि तिचे बालपणही अमेरिका, यूके आणि भारत या तीन देशांत गेले आहे. जो आणि अनुष्का यांना जुबीन आणि मोहन ही दोन मुले आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अनुष्का शंकरने शेअर केलेले काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...