आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दादासाहेब फाळके पुरस्कार'ने सन्मानित होणार अनुष्का शर्मा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या फाळकेंच्या नावे दिला जाणारा हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही ठेवलेय पाऊल 
- अनुष्का शर्मा हिने वयाच्या 25 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात यशाचे शिखर गाढले. भाऊ कर्नेश शर्मासोबत तिनं ‘क्लिन स्लेट फिल्म्स’द्वारे निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं.
- या प्रोडक्शनचा पहिला चित्रपट 'एनएच 10' ने बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. 'एनएच १०'नंतर 'फिलौरी' आणि 'परी' या दोन चित्रपटांची निर्मिती तिने केली. बॉक्स ऑफीसवर या दोन चित्रपटांना फारशी दाद मिळाली नाही. तरीही तिने आपला प्रवास थांबवलेला नाही. 
- अनुष्का आणि कर्नेशने त्यांच्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून नव्या प्रतिभांना संधी दिली. दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ असा विविध क्षेत्रात नव्या लोकांना कामाची संधी दिली. एकंदरीत तिच्या या कामगिरीची दखल घेत दादासाहेब फाळके या पुरस्काराने तिला गौरविण्यात येणार आहे.
- अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी चित्रपट 'सुई धाका' च्या चित्रिकरणामध्ये व्यक्त आहे. 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...