आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का ते प्रिती झिंटापर्यंत ARMY बॅकग्राऊंडशी आहे 10 अॅक्ट्रेसेसचे रिलेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा आणि प्रिती झिंटा. - Divya Marathi
अनुष्का शर्मा आणि प्रिती झिंटा.

बॉलिवूडमध्ये सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची. अनुष्का-विराट येत्या 12 डिसेंबरला इटलीतील मिलान येथे विवाह बंधनात बांधले जाणार आहेत. अनुष्का ही त्या मोजक्या अॅक्ट्रेसेसपैकी आहे ज्या आर्मी बॅकग्राऊंडशी संबंधीत आहेत. तिचे वडील अजय कुमार शर्मा हे आर्मीमध्ये कर्नल होते. सध्या ते निवृत्त असून अनुष्कासोबत मुंबईत राहातात. अनुष्काप्रमाणेच बॉलिवूडमध्ये निमरत कौर, प्रियंका चोप्रा, प्रिती झिंटा, लारा दत्ता  या अॅक्ट्रेसेस आर्मी बॅकग्राऊंडमधून आल्या आहेत. 

 

मॉडलिंगसाठी मुंबईत आली होती अनुष्का 
- अनुष्काचे प्राथमिक शिक्षण आर्मी स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बंगळुरु येथील माऊंट कारमेल कॉलेजमधून तिने ग्रॅज्युएशन केले.  
- करियरची पहिली फिल्म  'रब ने बना दी जोड़ी' (2008)  बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खानसोबत केली होती. अनुष्काची डेब्यू फिल्म सुपरहिट राहिली. 
- त्यानंतर बँड बाजा बारात (2010) मधील अनुष्काच्या भूमिकेचे सर्वत्र कौतूक झाले होते. या दोन्ही फिल्मसाठी अनुष्काला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. 
- अनुष्काने 'बदमाश कंपनी' (2010), 'पटियाला हाउस' (2011), 'लेडीज वर्सेस रिकी बहल' (2011), 'जब तक है जान' (2012), 'मटरू की बिजली का मंडोला' (2013), 'एनएच-10' (2015), 'ऐ दिल है मुश्किल' (2016)  सह अनेक चित्रपटांमध्ये नायिकाची भूमिका केली आहे. 

 

प्रिती झिंटा 
- प्रिती झिंटाचे वडील दुर्गानंद झिंटा आर्मीमध्ये मेजर होते. आता ते ह्यात नाहीत. प्रितीने 1998 मध्ये 'दिले से' मधून डेब्यू केले होते. तिने 'सोल्जर' (1998), 'क्या कहना' (2002), 'कल हो ना हो' (2003), 'कोई मिल गया' (2003), 'वीर जारा' (2004), 'कभी अलविदा ना कहना' (2006) सह अनेक फिल्मध्ये काम केले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या निमरत कौरच्या वडिलांबद्दल, दहशतवाद्यांनी केले होते अपहरण, पुढे काय झाले... 

बातम्या आणखी आहेत...