आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anushka Sharma Virat Kohli Fly For Their Honeymoon, Bollywood Actress Anushka Sharma

हनीमूनसाठी इटलीहून रवाना झाले Newly Weds कपल अनुष्का-विराट, बघा लग्नानंतरचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवविवाहित दाम्पत्य अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हनीमूनसाठी इटलीहून रवाना झाले आहे. हनीमूनसाठी या दाम्पत्याने रोमची निवड केली आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, हे दोघे आठवडाभर येथे हनीमून एन्जॉय करणार आहे. इटलीहून रवाना होण्यापूर्वी विराटने त्याच्या कुटंबासोबत एक सेल्फी घेतला. शिवाय अनुष्कासोबतचेही त्याचे दोन पाठमोरे फोटो समोर आले आहेत. दोघांनी 11 डिसेंबर रोजी इटलीतील टस्कनी येथे विवाह केला. 

 

कुटुंबीय भारताकडे झाले रवाना...
एकीकडे अनुष्का आणि विराट हनीमून साजरा करण्यासाठी रोमला रवाना झाले आहेत, तर दोघांचे कुटुंबीय भारतात परत येत आहेत. हनीमूनहून परतल्यानंतर मुंबई आणि दिल्लीत दोघांचे वेडिंग रिसेप्शन होणार आहे.


येथे होणार वेडिंग रिसेप्शन- 
- पहिले वेडिंग रिसेप्शन 21 डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. या रिसेप्शन पार्टीत विराट आणि अनु्ष्काचे कुटुंबीय सहभागी होतील. दुसरे रिसेप्शन मुंबईत 26 डिसेंबर रोजी होणार असून या पार्टीत बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मान्यवर उपस्थिती लावतील.
- मुंबईत होणा-या रिसेप्शनमध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, हरभजन सिंह, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी सहभागी होऊ शकतात. तर बॉलिवूडमधून आदित्य चोप्रा, राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान यांना निमंत्रण देण्यात आले आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, इटलीत लग्नानंतर क्लिक झालेले विराट-अनुष्काचे खास फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...