आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराटचे या पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन, इनव्हिटेशन कार्ड झाले Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने सोमवारी इटलीतील बर्गो फिनेशिटो येथे सिक्रेट मॅरेज केले आहे. सोमवारी रात्री दोघांनी ट्विट करुन लग्नाची माहिती शेअर केली. लग्न इटलीमध्ये झाले असून रिसेप्शन दिल्ली आणि मुंबईत होणार आहे.  पहिले रिसेप्शन दिल्लीत 21 डिसेंबरला तर 26 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे. विराट-अनुष्काच्या रिसेप्शनचे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

 

दिल्लीत नातेवाईक-आप्तांना निमंत्रण... 
- 7 डिसेंबरच्या रात्री अनुष्का आणि विराट यांचे कुटुंब इटलीला रवाना झाले होते. मात्र त्यावेळी कोणीही लग्नाबद्दल एका अक्षरानाही काही बोलले नव्हते. त्याबद्दल बोलणेच त्यांनी टाळले होते. 
- अनुष्का आणि विराटने लग्न इटलीतील मिलान शहरात केले आहे. या दोघांचे भारतात स्वागत होणार असून लग्नाचे पहिले रिसेप्शन 21 डिसेंबरला दिल्लीत होईल. येथे दोघांच्या नातेवाईंकाना निमंत्रित केले जाणार आहे. यानंतर 26 डिसेंबरला दुसरे रिसेप्शन मुंबईत होणार आहे. 
- मायानगरी मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि अनेक सेलिब्रिटीज सहभागी होण्याची शक्यता आहे. 

 

ताज डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह येथे रिसेप्शन
- अनुष्का आणि विराटच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन दिल्लीत ताज डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. 
- या हॉटेलमध्ये 2 बॉल रुम आहेत, येथे 500 ते 1000 लोक एकत्र येऊ शकतात. 
- इव्हेंटासाठी येथे मुमताज, जहांगीर, रोशनारा, शीश महल आणि जहानारा असे हॉल आहेत.
- या हॉटेलमध्ये जिवा स्पा, फिटनेस सेंटर, एक आऊटडोअर स्विमिंग पुल, योगा क्लासेस इत्यादी सुविधा आहेत. 
- याशिवाय हॉटेलमध्ये 403 रुम्स आणि 41 सुइट्स आहेत. यामध्ये लक्झरी रुम्स आणि ग्रीनरीने भरपूर असलेल्या रुम्स आहेत. 
- हॉटेलमध्ये ब्लू बार लाँज आहे. त्यासोबतच हॉटेलमध्ये इंडियन, यूरोपियन आणि चायनिज फूडसाठी डायनिंग हॉल आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा हॉटेलचे InSide Photos... 

बातम्या आणखी आहेत...