आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 दिवसांमध्ये 67 कारागिरांनी तयार केला अनुष्काचा ब्रायडल लहेंगा, अशी होती ज्वेलरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्माने विवाह सोहळ्यात डिझायनर सब्यसाचीन डिझाइन केलेला लहेंगा आणि ज्वेलरी घातली होती. - Divya Marathi
अनुष्का शर्माने विवाह सोहळ्यात डिझायनर सब्यसाचीन डिझाइन केलेला लहेंगा आणि ज्वेलरी घातली होती.

अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी इटलीत साताजन्माची गाठ बांधली आहे. नवरी म्हणून समोर आलेली अनुष्का अतिशय सुंदर दिसते होती. अनुष्काच्या लग्नासाठीचे ड्रेसेस डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केले होते, त्यासोबत तिचा ब्रायडल लूक अधिक खुलून दिसत होतो डायमंड ज्वेलरीमुळे. ही ज्वेलरी सब्यसाचीची हेरिटेज डायमंड ज्वेलरी होती. 

अनुष्कासाठीचा लहेंगा तयार झाला 32 दिवसांमध्ये

 

असा होता ब्रायडल लहेंगा
- अनुष्का शर्माने लग्नामध्ये डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. हा लहेंगा तयार करण्यासाठी 67 कारागिरांनी 32 दिवस मेहनत केली होती. पिंक लहेंग्यावर रेनिसन्सची एम्ब्रॉयडरी केलेली होती. यामध्ये सोने आणि चांदेचे त्यासोबतच मेटच्या धाग्यांचा वापर करण्यात आला होता. त्यावर पर्लस् आणि बिड्सची सजावट होती. 
- अनुष्काने लग्नामध्ये जो नेकलेस घातला होता तो अनकट डायमंड आणि पर्ल चोकर यापासून तयार केलेला होता. तिची इअररिंग आणि इतरही ज्वेलरी अनकट डायमंडची होती. 

 

साखरपुड्यात नेसली वेलवेटची साडी 
- साखरपुड्यात अनुष्का साडीमध्ये होती. मरुन कलरच्या वेलवेटच्या साडीमध्ये अनुष्का अधिकच सुंदर दिसत होती. तिने तिचा लूकला हेवी नेकलेस आणि ईअररिंगने पूर्णत्व दिले होते. त्यासोबतच केसांमध्ये लाल गुलाम माळले होते आणि लाल बिंदीही होती.  

 

ग्राफिक्स फ्यूशिया लहेंगा

मेंदी सेरेमनीमध्ये अनुष्काने पिंक आणि ऑरेंज कलरचा ग्राफिक्स फ्यूशिया लहेंगा स्कर्ट परिधान केला होता. त्याला किंमती खड्यांनी डिझाइन केलेगेले होते. लहेंग्यावर अनुष्काने फ्लोरल प्रिंटचा टॉप घातला होता. त्यासोबत हेवी झुमके होते. तो अनकट डायमंड आणि  Iranian turquoise, जपानी पर्लने तयार केलेला होता. यावेळी अनुष्काने न्यूड मेकअप केला होता, आणि केस मोकळे सोडले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, नववधूच्या वेशातील अनुष्का...  

बातम्या आणखी आहेत...