आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीमूनवरुन परतल्यानंतर भयावह अंदाजात दिसली अनुष्का शर्मा, हिंमत असेल तर पाहा VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने 11 डिसेंबर रोजी क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत सात फेरे घेतले. लग्नाच्या वेशात आणि नंतर हनीमूनदरम्यानही अनुष्का फारच सुंदर दिसली. पण हनीमूनवरून परतल्यानंतर अनुष्का शर्माचे एक वेगळेच रुप आपल्याला पाहायला मिळत आहे. मंगळवारी रात्री अनुष्काने सोशल मीडियावर तिचा एक भयानक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात ती भूताच्या रुपात दिसणार आहे. 10 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर हळूहळू जखमा होताना दिसत आहेत. आगामी चित्रपट 'परी'मधील तिचा हा लुक आहे. 

 

'परी' अनुष्‍का शर्माच्या प्रोडक्शन हाउन क्लीन स्लेट फिल्म्सचा तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रथम 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता पण जेव्हा सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी स्टारर 'अय्यारी'ची रिलीज डेट 26 जानेवारीपासून 9 फेब्रुवारी पुढे करण्यात आली तेव्हा अनुष्का शर्माने कोणत्याही प्रकारच्या क्लॅशपासून वाचण्यासाठी 'परी'ची रिलीज डेट पुढे केली. आता हा चित्रपट 2 मार्चला रिलीज करण्यात येईल. 


अनुष्काच्या प्रोडक्शन हाउसचा पहला चित्रपट 'NH 10' 2015 साली रिलीज झाला होता. दुसरा चित्रपट 'फिल्लौरी'मध्येही अनुष्का शर्माने भूताची भूमिका केली होती. 'परी'शिवाय अनुष्का शाहरुख-कतरिनासोबत 'झिरो'चे शूटिंग करत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, परी चित्रपटातील हा अनुष्का शर्माचा व्हिडिओ....

बातम्या आणखी आहेत...