आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का-विराटचे मिलानमध्ये \'बँड बाजा बारात\', पाहा Wedding PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे इटलीमध्ये शुभमंगल. - Divya Marathi
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे इटलीमध्ये शुभमंगल.

बोर्गो फिनेशिटो (इटली) - बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली यांचे सोमवारी इटलीतील बोर्गो फिनेशिटो येथे शुभमंगल झाले आहे. याची माहिती या नवविवाहित जोडप्याने स्वतः ट्विट करुन दिली. त्यांनी लिहिले आहे, 'आम्ही एकमेकांना सदैव प्रेमबंधनात राहाण्याचे वचन दिले आहे. चाहते, आप्तांच्या प्रेमाने हा दिवस आणखीच खास झाला आहे. आमच्या आयुष्याचा या सुंदर वळणावर तुम्ही आमच्या सोबत आहात, यासाठी सर्वांचे धन्यवाद.'

 

7 डिसेंबरच्या रात्री अनुष्का आणि विराट यांचे कुटुंब इटलीला रवाना झाले होते. मात्र त्यावेळी कोणीही लग्नाबद्दल एका अक्षरानाही काही बोलले नव्हते. त्याबद्दल बोलणेच त्यांनी टाळले होते. 
- अशी माहिती आहे, की बॉलिवूडची आघाडीची अॅक्ट्रेस आणि क्रिकेटच्या या आघाडीच्या खेळाडूच्या लग्नाला दोघांच्या जवळच्या नातेवाईकांसह 15 मित्र उपस्थित होते. 
- अशीही माहिती आहे, की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूडचा किंगखान अर्थात शाहरुख खान या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी इटलीमध्ये होता. 
- विराटचा बालपणीचा मित्र आणि कोच राजकुमार शर्मा देखील मित्राच्या लग्नाला उपस्थित होता. 


पंडित अनंत बाबाही इटलीला.. 
- अनुष्का-विराट यांचे शुभमंगल अनंतधाम आत्मधाम हरिद्वार येथील महाराज अनंत बाबा यांनी लावून दिले आहे. अनुष्का आणि विराटच्या कुटुंबियांसोबत अनंत बाबाही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर होते. 
- विराट आणि अनुष्का गेल्यावर्षी उत्तराखंडमध्ये भेटले होते, तेव्हा त्यांच्यासोबत अनंतबाबाचा एक फोटो समोर आला होता. तेव्हाच या दोघांचा रोका अर्थात लग्न नक्की झाले होते. 
- विराट अऩुष्का बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 

 

21 आणि 26 डिसेंबरला रिसेप्शन 
- अनुष्का आणि विराटने लग्न इटलीतील मिलान शहरात केले आहे. या दोघांचे भारतात स्वागत होणार असून लग्नाचे पहिले रिसेप्शन 21 डिसेंबरला दिल्लीत होईल. येथे दोघांच्या नातेवाईंकाना निमंत्रित केले जाणार आहे. यानंतर 26 डिसेंबरला दुसरे रिसेप्शन मुंबईत होणार आहे. 
- मायानगरी मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि अनेक सेलिब्रिटीज सहभागी होण्याची शक्यता आहे. 

 

अॅड शूटच्या वेळी झाली पहिली भेट... 
- विराट-अनुष्का एकमेकांना 2013 पासून डेट करत होते. यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शुटिंगच्या निमित्ताने झाली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, लग्नात अशी धमाल केली विराटने... 

बातम्या आणखी आहेत...