आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ते घडलेच! अर्जून रामपालचा पत्नी मेहेरसोबत काडीमोड, मोडला 20 वर्षांचा संसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासूनच नव्हे तर वर्षांपासून ज्या बॉलिवूड कपलविषयी घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या ते अखेर खरे ठरले आहे. बॉलिवूडचे सर्वात स्टायलिश कपल म्हणून ओळखले जाणारे अर्जून आणि मेहेर रामपाल हे विभक्त झाले आहेत. लग्नाच्या तब्बल 20 वर्षानंतर अर्जून आणि मेहेर यांनी वेगळे होण्याचा         निर्णय घेतला आहे. दोघांसाठी फार अवघड असा हा निर्णय होता पण तो व्यवस्थित पद्धतीने सांभाळण्यात यावा असे त्यांना वाटत आहे.  या दोघांनी म्हटले आहे की, आम्हाला वाटते की आता आम्ही दोघांनी आपापल्या आयुष्यात पुढे जायचे आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही दोघे एकमेकांसाठी कायम असू आणि विशेषकरुन आमच्या मुलींसाठी.

 

अर्जून आणि मेहेर यांना दोन मुली आहेत त्यांचे नाव मानिका (16) आणि मान्या (13) असे आहे.  

 

एका इंग्रजी दैनिकाने जेव्हा अर्जून रामपालशी संपर्क केला तेव्हा अर्जूनने तो याविषयी जास्त काही सांगू शकत नाही असे म्हणाला. त्याने एकूणच म्हटले की नाते संपू शकते पण त्यातील प्रेम नेहमीच असते. जोडीदारापासून विभक्त होणे हे नेहमीच फार त्रासदायक असते.

मेहेर आणि अर्जून यांनी सोबतच एक स्टेटमेंट दिले आहे की, जवळपास 20 वर्षांच्या सुंदर आणि प्रेमाने, आठवणीने भरलेले हे नात्याने आता दोघांसाठी वेगवेगळ्या वाटा शोधल्या आहेत. आम्हाला असे जाणवत आहे की आता आम्ही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेगळे होणे गरजेचे आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अर्जून आणि मेहेर रामपाल यांचे काही खास Photos..

 

बातम्या आणखी आहेत...