आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी कपूरच्या 'धडक'चे ट्रेलर पाहून अर्जून कपूरने केले ट्वीट, बहिणीला दिला असा मॅसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काल सोमवारचा दिवस जान्हवी कपूरसाठी खूप खास होता. तिचा पहिला चित्रपट धडकचे ट्रेलर लाँच झाले आहे. या इवेंटमध्ये जान्हवीसोबत बोनी कपूर, बहीण खुशी कपूर, काका अनिल कपूर आणि भाऊ मोहित मारवाह उपस्थित होते. 'धडक'मध्ये जान्हवीसोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरही झळकणार आहे. हा चित्रपट २० जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट मेवाडी मुलगी आणि दलित मुलगा यांची लव्हस्टोरी आहे.

 

'धडक'च्या ट्रेलरबद्दल बॉलिवूड कलाकारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. सर्वांनीच जान्हवीला शुभेच्छा दिल्या आहेत. अशावेळी तिचा सावत्र भाऊ अर्जून कपूरनेही तिच्यासाठी खास ट्वीट केले आहे. अर्जून कपूरने ट्वीटमध्ये लिहीले की, "जान्हवी कपूरने तिची एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे. दोघांनी केलेला अभिनय पाहण्यासारखा आहे. माझ्याकडून तुमच्या दोघांना खूप शुभेच्छा.  मी धडकच्या संपू्र्ण टीमला खूप शुभेच्छा देतो असे त्याने म्हटले आहे."

 

जान्हवीचा यावेळेसचा सर्वात मोठा सपोर्ट अर्जून कपूर आहे. ट्रेलर लाँचअगोदर अर्जूनने जान्हवीसाठी एक मॅसेज लिहीला होता त्यात त्याने विदेशात असल्याने ट्रेलर लाँचला उपस्थित नसल्याबद्दल माफी मागितली होती. तर अर्जूनच्या या मॅसेजवर जान्हवीने मी प्रॉमिस करते की माझ्यावर तुम्हाला गर्व वाटेल. 

 

चित्रपट पुढच्या महिन्यात २० जुलैला रिलीज होणार आहे. चित्रपट मेवाडी बॅकग्राउंडवर बनलेला आहे. 2016 साली आलेल्या मराठी ब्लॉकबस्टर ठरलेल्या सैराटचा हा रिमेक आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जान्हवी कपूरचे भाऊ अर्जून कपूर आणि बहिणींसोबतचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...