आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धडक'चा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी अर्जून कपूरने जान्हवीसाठी लिहीले असे काही, श्रीदेवीलाही झाला असता आनंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आज मराठी चित्रपट 'सैराट'चा रिमेक असलेला 'धडक'चे ट्रेलर रिलीज होणार आहे. या ट्रेलर रिलीजबद्दल संपूर्ण बॉलिवूड उत्साहात आहे कारण श्रीदेवीची मुलगी जान्हवी या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणार आहे. 

 

श्रीदेवी यांच्या अचानक झालेल्या निधनाने जान्हवी कपूर मनातून तुटली होती पण तरीही तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. आता अशावेळी तिचा सावत्र भाऊ अर्जून कपूर तिचा भक्कम आधार म्हणून उभा आहे.  

 

अर्जून सध्या आगामी चित्रपट  'नमस्ते इंग्लंड'चे शूटिंग लंडनमध्ये करत आहे यामुळे तो जान्हवीच्या धडक चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला उपस्थित राहू शकणार नाही पण त्याने एक ट्वीट करत त्याचे बहिणीवरील प्रेम व्यक्त केले आहे. त्याने लिहीले की, उद्यापासून तु प्रेक्षकांच्या जीवनाचा एक भाग बनणार आहेस कारण तुझ्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मी तुझी माफी मागतो की मी तुझ्यासोबत तिथे नाही पण मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तु काहीही काळजी करु नकोस. 

 
अर्जूनचे हे ट्वीट जर आज श्रीदेवी यांनी वाचले असते तर नक्कीच त्यांनाही तितकाच आनंद झाला असता जेवढा जान्हवीला झाला असेह यात शंकाच नाही.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अर्जून कपूरने जान्हवीसाठी केलेले ट्वीट्...

बातम्या आणखी आहेत...