आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरमानच्या मारहाणीमुळे हॉस्पीटलला पोहोचली होती गर्लफ्रेंड, आता केले खळबळजनक खुलासे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिव्ह इन गर्लफ्रेंड नीरु रंधावाला बेदम मारहाण केल्यामुळे पोलिसांनी अरमान कोहलीला अटक करुन तुरुंगात पाढवले आहे. यादरम्यान नीरूने अरमान कोहलीसोबतच्या संबंधावर काही खळबळजनक खुलासे केले आहेत. एका मुलाखतीत नीरूने सांगितले की, अरमानने जर माफी मागितली आणि तिला यापुढे कधीही त्रास न देण्याचे आश्वासन दिले तर ती तक्रार मागे घेऊ शकते.

 

मुलाखतीत नीरूने सांगितले की, अरमानचे असे रुप पाहून आता तिला भीती बनसली आहे. नीरूचा चेहरा इतका खराब झाला की तिला सर्जरी करावी लागली आहे. तिने सांगितले, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये नेहमी मुलीलाच चुकीचे ठरवले जाते त्यामुळे मी आणि अरमान अनेकदा सोबत दिसत असू तरीही त्याने आमच्या नात्याबद्दल कधी काही न बोलणे पसंत केले.

 

नीरू रंधावाने सांगितले की, गोव्यात अरमानचा बंगला आहे ज्याच्या देखभालीचे काम तिच्यावर होते. हा बंगला अनेकदा भाडे तत्वावरही दिला जातो. अनेकदा भाडे हे तेथील स्टाफलाच करण्यात येते पण तरीही अरमानने तिला त्या पैशांबाबत विचारपुस करण्यास सुरुवात केली. यावर स्टाफला विचारुन सांगते असे त्याला सांगितल्यावर त्याने तिला शिव्या देण्यास सुरुवात केली आणि डोके धरुन जमिनीवर आपटले. यानंतर मला पोलिसांना काहीच सांगणार नाही या अटीवर हॉस्पीटलला घेऊन आला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अरमान कोहली आणि नीरू रंधावाचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...