आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमाननंतर आता 'संजू' मधील रणबीरच्या भूमिकेविषयी बोलला 'सर्किट'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'संजू' 29 जूनला रिलीज होत आहे. चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे. चित्रपटात रणबीर कपूरच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. तर 'मुन्नाभाई एमबीबीएस' मध्ये संजय दत्तचा को-स्टार राहिलेला अरशद वारसी (सर्किट) म्हणाला आहे की- रणबीर कपूर 'संजू' मध्ये शानदार दिसतोय. परंतू दूस-या कुणासारखे बनणे आणि बोलणे वेगळी गोष्ट आहे. अरशद म्हणाला - संजू तर संजू आहे. तुम्ही काहीही केले तरी त्यांच्यासारखे बनू शकत नाही. इंडस्ट्रीमध्ये फक्त एक संजय दत्त आहे आणि मला वाटते की, त्यांच्यासारखे कुणीही बनू शकत नाही. 


सलमानला पसंत आली नाही रणबीरची भूमिका...
- काही दिवसांपुर्वी सलमान खान 'संजू' चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेविषयी बोलला होता की, 'मला रणबीरचा संजय दत्तचा अवतार विशेष आवडला नाही. संजय दत्तची भूमिका फक्त संजय दत्तच साकारु शकतो. बॉलिवूडच्या कोणताही अॅक्टर संजय दत्तची भूमिका ऑनस्क्रीन पडद्यावर निभावू शकत नाही. चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तचा 20 वर्षांपासून तर 58 वर्षांपर्यंतच्या भूमिका साकारल्या आहेत. यावर सलमान म्हणाला - जर चित्रपटाच्या नंतरच्या भागात संजय दत्तची भूमिका स्वतः संजय दत्तने साकारली असतील तर जास्त चांगले झाले असते.' चित्रपटात रणबीरसोबत परेश रावल, मनीषा कोइराला, दीया मिर्जा, विक्की कौशल, जिम सर्भ, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूरही आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणबीर कपूरचा चित्रपटातील लूक...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...