आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोय, बरोबर 16 वर्षापूर्वी मी सिनेपत्रकारितेचा माझ्या सर्वात अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घेतला. प्रसिद्ध खलनायक प्राण यांच्या वाढदिवशी मला त्यांची मुलाखत घेण्याचे सौभाग्य मिळाले. प्राण यांच्या वाढदिवशी त्यांची मुलाखत मला मिळणे ही गोष्ट माझ्यासाठी खुप महत्त्वाची गोष्ट होती. देशपांडे हे माझ्या एका खास मित्राचे नातेवाईक होते. ते प्राण साहेबांचे मोठे फॅन होते. प्राण यांना फक्त एकदा भेटायंच एवढीच या गृहस्थाची इच्छा होती. देशपांडे यांनी यापुर्वीही प्राण साहेबांना भेटण्याचे अटोकाट प्रयत्न केले. परंतू त्यांना यश मिळाले नव्हते. मी कलाकारांच्या मुलाखती घेतो हे त्यांना माझ्या मित्राने सांगितले आणि त्यांनी माझ्या मागे हट्टच धरला. त्यांच्या हट्टापायी मी प्राण यांची मुलाखत घेण्याचे मनावर घेतले. औरंगाबादवरुन मी मुंबईसाठी निघालो आणि सकाळी मुंबईत पोहोचलो. प्राण यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या सचिवाला त्यांच्याविषयी विचारणा केली. त्यांनी सुरुवातीला मला नकार दिला. प्राणसाहेब आज वेळ देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. परंतू नंतर ते म्हणाले की, मी तुम्हाला आश्वासन देऊ देऊ शकत नाही. परंतू जमले तर नक्कीच तुम्हाला प्राण यांच्यासोबत भेटवेल. त्यांच्या सचिवाने सांगितलें मी आश्वासन देत नाही. तुम्ही या जमले तर बघू... माझ्यासोबत आलेले प्राण यांचे चाहते न्यायाधीश होते. ते प्राण यांची भेट होणार यामुळे खुप आनंदी होते. देशपांडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमितित त्यांच्यासाठी 550 रुपयाचा बुके आणि 1 किलो मिठाई घेतली.
शेवटी प्राण यांच्या बहुमजली इमारतीत येऊन पोहचलो. आमच्या अगोदर रणधीर, ऋष, राजीव कपूर त्यांच्या भेटीला आले होते. ते निघाल्यावर आम्ही प्राण यांची भेट घेणार होते. कपूर कुटुंबीय गेल्यानंतर आम्ही प्राण यांना भेटण्यासाठी वरच्या मजल्यावर गेलो आणि मी न्यायाधीश देशपांडे यांची प्राण यांना ओळख करुन दिली आणि शाल, मिठाई, बुके देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नंतर मी प्राण यांची मुलाखत घेतली. प्राण साहेबांची मुलाखत घेतल्यानंतर माझ्यासोबतचे न्यायाधीश गृहस्थांचा आनंद गगणात मावत नव्हता. त्यांना ही भेट झाली यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांना जो आनंद झाला होता. तसाच काही आनंद मलाही झाला होता. कारण प्राण यांनी मला त्यांनी त्यांच्या वाढदिवशी ही अनमोल भेट दिली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा कोण आहेत अशोक उजळंबकर आणि त्यांनी घेतलेल्या दिग्गजांच्या मुलाखतींविषयी...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.