आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bacchan And Daughter Shweta Could Land Up In A Legal Soup After Hosting This Commercial

...म्हणून ही जाहिरात करुन वादाच्या भोव-यात अडकले अमिताभ आणि त्यांची कन्या, दाखल होऊ शकते तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  अमिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिची प्रमुख भूमिका असलेली जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बँक कर्मचारी आणि बँकिंग व्यवस्थेच्या भावना दुखावल्याप्रकरणी ‘कल्याण ज्वेलर्स’ला ऑल इंडिया बँकिंग ऑफिर्सकडून नोटीस बजावण्यात आली आहे.


अमिताभ बच्चन हे कल्याण ज्वेलर्सचे सदिच्छादूत आहेत. या ब्रँडच्या एका जाहिरातीत अमिताभ आणि त्यांची कन्या श्वेता बच्चन नंदा झळकले आहेत. ही जाहिरात नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. मात्र या जाहिरातीवर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आक्षेप घेतला आहे. ‘ही जाहिरात अत्यंत हिन दर्जाची असून यात बँक कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत’ असा आरोप ऑल इंडिया बँकिंग ऑफिसर कॉन्फिडरेशनच्या सरचिटणीस सौम्या दत्त यांनी केला आहे. तसेच आता या प्रकरणी कल्याण ज्वेलर्सला कोर्टात खेचण्याचा इशारही देण्यात आला आहे.

 

मात्र कल्याण ज्वेलर्सने वरील संघटनेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही जाहिरात पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता असे उत्तर कल्याण ज्वेलर्सने दिले आहे. तसेच तीन दिवसांच्या आत जाहिरातीत डिस्क्लेमर टाकू. ही जाहिरात काल्पनिक असून कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता असे जाहिरातीच्या सुरूवातीला आम्ही लिहू असे आश्वासन कल्याण ज्वेलर्सने दिले आहे. 

 

जाहिरातीत अमिताभ पेंशनर घेणा-या वृद्धाच्या भूमिकेत आहेत, तर श्वेता त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आहे. या जाहिरातीत वृद्ध व्यक्तीला प्रामाणिक व्यक्तीच्या रुपात दाखवण्यात आले आहे. त्या व्यक्तीच्या पासबुकमध्ये एका महिन्यात दोनदा पेन्शन जमा होते. ती पेन्शन परत करण्यासाठी ती वृद्ध व्यक्ती त्याच्या मुलीसोबत बँकेत येते. त्यावेळी बँकेतील कर्मचारी त्यांना वाईट वागणूनक देताना दिसतात. जाहिरातीत बँकेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. 

 

बातम्या आणखी आहेत...