आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर भाड्याने देण्यापूर्वी सावधान, तुमची होऊ शकते या अभिनेत्रीसारखी अवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही भाडेकरी ठेवणार असाल, तर सावधगिरी बाळगा. कारण बॉलिवूड अभिनेत्री मेघना नायडूसोबत जे घडले, ते तुमच्यासोबतही घडू शकते. होय, मेघनाने फेसबुकच्या माध्यमातून तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीचा खुलासा केला आहे. मेघनाचे गोव्यात एक घर असून तिने ते भाड्याने दिले होते. तिच्या भाडेकरुने भाडे तर दिलेच नाही, शिवाय घरातील सामान घेऊन तो पसार झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी मेघनाने एका मेसेजसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट तिने चाहत्यांनी जास्तीत जास्त शेअर करण्याची विनंती केली आहे.

पोस्टमध्ये काय लिहिले मेघनाने... 
 - मेघनाने तिच्या FB पोस्टमध्ये लिहिले, की गोव्यात तिचे एक घर असून तेथील केअर टेकरने तिचे घर दोन लोकांना भाड्याने दिले होते. दोघांनी घर भाड्याने घेताना स्वतःला पत्नी-पत्नी असल्याचे सांगितले होते.
- भाडेकरुने केअर टेकरला दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे मुंबईचे असून न्युझिलंड येथे नोकरीला आहेत. पुरावा म्हणून दोघांनी त्यांचे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स दिले होते. पण ते बनावट असल्याचे आता पुढे आले आहे.
- हे दोघेही घराचे भाडे न चुकवता रात्रीतून पसार झाले. इतकेच नाही तर घरातील सामानदेखील त्यांनी लंपास केले आहे. यामध्ये महागडे कपडे, बुट आणि स्पीकरचा समावेश आहे. मेघनाने सांगितल्यानुसार, चोरांनी तिचे अंतर्वस्त्र आणि सॉक्सदेखील सोडले नाहीत.
- मेघनाने सांगितल्यानुसार, तिने हे सर्व सामान बेडच्या आता स्टोअर करुन ठेवले होते. पण आता हे सर्व घेऊन दोन्ही चोर पसार झाले आहेत.

 

घरातील सामानाची केली तोडफोड...
- मेघनाने तिच्या पोस्टमध्ये सांगितले, की या चोरांनी तिच्या घराचे बरेच नुकसान केले आहे. त्यांनी घरातील सामानाची तोडफोड केली आहे. घरात लावलेल्या फ्रेम्स तोडण्यात आल्या आहेत. शिवाय फर्नीचरदेखील हलवण्यात आले आहे. इतकेच नाही तर चोरांनी घराच्या दाराचे लॉकदेखील बदलले.
- मेघना गोव्याला पोहचण्यापूर्वी सोसायटीने लॉक तोडून कुठले सामाना चोरीला गेले, याचा शोध घेतला.


केअर टेकरकरुन लुबाडले 85 हजार रुपये
- मेघनाने पोस्टमध्ये सांगितले, की या चोरांनी तिच्या केअर टेकरच्या मुलाला न्युझिलंडमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल 85 हजार लुबाडले आहेत. शिवाय एका अन्य महिलेकडून 40 हजार रुपये आणि एका व्यक्तीचे जमीनचे कागदपत्र लंपास केले.
- मेघनाने अपील केली, की तिची ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरुन आरोपीला पकडण्यात मदत होऊ शकेल. शिवाय जर या दोन व्यक्ती कुठे आढळल्यास तत्काळ पोलिसांसोबत संपर्क साधण्याचे आवाहन मेघनाने केले आहे.
- शेअर केलेल्या फोटोविषयीची माहिती देताना मेघनाने सांगितले, की केअर टेकरने घर भाड्याने देताना त्यांचा हा फोटो क्लिक केला होता. फोटोत एक चेहरा लपवण्यात आला आहे, ती व्यक्ती केअर टेकरची मुलगी आहे. 


पुढे बघा, मेघनाची फसवणुक करणा-या चोरांचे फोटो आणि मेघनाची पोस्ट...  

बातम्या आणखी आहेत...