आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rape केसमध्ये जर अटक टळली तर उद्या बोहल्यावर चढणार मिथून चक्रवर्तींचा मुलगा! भावी सासू म्हणाली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह उर्फ महाअक्षय चक्रवर्तीवर एका भोजपुरी अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप लावला असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याचे लग्न येत्या 7 जुलै रोजी अभिनेत्री मदालसा शर्मासोबत होतंय. त्याच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे. आज मिमोह आणि मदालसा यांची संगीत सेरेमनी आहे. पण कालच मुंबई उच्च न्यायालयाने मिमोह आणि त्याची आई योगिता बाली या दोघांना एक मोठा धक्क देत दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.  

 

दिल्लीच्या रोहिणी कोर्टाच्या आदेशावरून लग्नाच्या ऐन पाच दिवसांआधी याप्रकरणी महाअक्षय व योगिता बाली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे मिमोह आणि योगिता बाली या दोघांनाही अटक होण्याची शक्यता आहे. ही अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दोघांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. पण न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.  त्यामुळे जर का  दोघांना अटक झाली तर मग मात्र  या प्रकरणामुळे मिमोहचे 7 तारखेला होणारे लग्न संकटात येण्याची शक्यता आहे. पण जर ही अटक टळली तर मात्र ठरलेल्या वेळेत लग्न होणार असल्याचे समजते. 

 

मिमोहच्या भावी सासूबाई म्हणतात, लग्न ठरलेल्या तारखेलाच होणार 
‘यस बॉस’, ‘नदिया के पार’ फेम अभिनेत्री शीला शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मासोबत मिमोहचे लग्न होणार आहे. पण ऐन लग्नाच्या तोंडावर महाअक्षयवर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने हे लग्न होणार की नाही, याबद्दल संशय निर्माण झाला होता. पण हे लग्न होणार, असे महाअक्षयची भावी सासू शीला शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. महाअक्षय तक्रारकर्तीला 2015 मध्ये भेटला होता. आम्हाला या प्रकरणाची कल्पना आहे. त्याच्या लग्नात विघ्न आणण्यासाठी ऐन लग्नाच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे. आम्हाला सत्य काय ते माहित असल्याने मिमोह आणि मदालसाचे लग्न रद्द होण्याचे कारणचं नाही. हे लग्न ठरलेल्या तारखेलाचं होईल, असे शीला शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

 

कोणत्या चित्रपटांमध्ये झळकली आहे मिमोहची भावी पत्नी, जाणून घ्या तिच्याविषयी..

 

बातम्या आणखी आहेत...