आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - इस्त्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी शालोम बॉलिवूड प्रोग्रॅमला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सारा नेतन्याहूही होत्या. नेतन्याहू यांनी यावेळी सांगितले की, "संपूर्ण जगभरात बॉलिवूडची क्रेझ आहे. नेतन्याहू म्हटले की मला वाटले होते मीच मोठा माणूस आहे पण जेव्हा मी अमिताभ बच्चन यांना पाहिले तेव्हा मी निशब्द झालो. त्यांच्याकडे माझ्याहून जास्त 3 कोटी ट्वीटर फॉलोअर्स आहेत." यावेळी अमिताभ बच्चन यांनी नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीसोबत तसेच इतर सर्व कलाकारांनी सेल्फीही घेतला. इस्त्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर रविवारपासून आले होते.
ऐश्वर्याने भेट दिला बुके..
- बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचे स्वागत ऐश्वर्या रॉय हिने बुके भेट देऊन केले. यावेळी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि यूटीवीचे CEO रॉनी स्क्रुवाला यांनीही नेतन्याहू यांचे स्वागत केले.
- अमिताभ यांनी सेल्फी घेतला तेव्हा फोटोत ऐश्वर्या, अभिषेक बच्चन, करण जौहर, सुभाष घई, इम्तियाज अली, रॉनी स्क्रूवाला, सारा अली खान आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी उपस्थित होते.
बॉलिवूड पाहण्याबद्दल होते फार उत्सुक..
-16 जानेवारी नेतन्याहू यांनी म्हटले होते की, 'मी आणि माझी पत्नी सारा बॉलिवूडची अनोखी दुनिया पाहण्यास फारच उत्सुक आहोत.'
लंच करतेवेळी वाजवले गेले श्री 420 चे गाणे..
- 16 जानेवारी रोजी नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीसाठी खास लंच ठेवले होते. त्या लंचवेळी श्री420 चित्रपटाचे गाणे वाजवण्यात आले होते.
- लंचनंतर इकोनॉमिक रिलेशन सेक्रेटरी विजय गोखले यांनी म्हटले की, "मोदी यांनी होस्ट केलेल्या लंच पार्टीत लाईव्ह बँडने 'ईचक दाना-बीचक दाना'वर परफॉर्म केले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अनेक इस्त्राईली लोकांनी त्यांना ते गाणे माहीत असल्याचे सांगितले."
श्री420 मधील हे गाणे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, नेतन्याहू आणि बॉलिवूड सेलिब्रेटींचे फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.