आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांपुर्वी सोनमला ओळखत नव्हती तिची खास मैत्रिण स्वरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूर 33 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तिची खास मैत्रिण स्वरा भास्करसोबत खास बातचीत केली. या खास बातचीतमध्ये स्वराने सांगितले की, 'रांझणा'(2013) च्या सेटवर सोनमसोबत तिची पहिले भेट झाली होती. यापुर्वी ती सोनमला ओळखायची पण नाही. एवढेच नाही जोपर्यंत ती सोनमला भेटलेली नव्हती, तोपर्यंत ती तिला गर्विष्ठ समजायची. तिला वाटत होते की, सोनम फक्त स्वतःमध्येच गुंग असणारी आहे. परंतू स्वरा जेव्हा सोनमला भेटली तेव्हा तिचे गैरसमज दूर झाले.


सोनमला गिफ्ट देण्यापुर्वी विचार करते स्वरा
- बातचीत करताना स्वराला विचारण्यात आले की, सोनमच्या बर्थडे गिफ्टच्या रुपात काय देणार, तेव्हा तिने सांगितले की, "मला प्रत्येक वेळी तिला गिफ्ट देण्यापुर्वी विचार करावा लागतो. कारण तिच्याकडे सर्व काही आहे. " स्वराने सांगितले की, जर मी तिला गिफ्ट देऊ शकले नाही. तर ती स्वतः मला सांगते की, मला माझे गिफ्ट मिळालेले नाही. स्वरानुसार सोनमसाठीचे तिचे दोन गिफ्ट पेंडिगमध्ये आहेत. तिने सोनमला अजून लग्नाचे गिफ्टही दिलेले नाही.
 

 

बातम्या आणखी आहेत...