आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपना चौधरीने सुरु केली फिल्मची शूटिंग, धर्मेंद्रच्या पुतण्यासोबत करणार बॉलिवूड डेब्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस-11'मधून बाहेर पडलेली हरियाणवी डान्सर सपना चौधरी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने तिच्या पहिल्या फिल्मची शुटिंग सुरु केली आहे. नुकतेच सपनाच्या शूटिंगचे ऑन लोकेशन फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये लाइट ग्रीन अँड ऑरेंज कलरच्या पटियाला सूटमध्ये बाजेवर बसलेली दिसते. यामध्ये तिची लांब वेणी लक्ष वेधून घेते. 

 

धर्मेंद्र यांच्या पुतण्यासोबत करणार डेब्यू...
- सपना चौधरी 'नानू की जानू' फिल्ममधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. 
- या फिल्ममध्ये तिच्यासोबत धर्मेंद्र यांचा पुतण्या अॅक्टर अभय देओल दिसणार आहे. 
- फोटोमध्ये दोघेही शूटिंग लोकेशनवर कूल अंदाजात दिसतात. 

 

2018 मध्ये रिलीज होणार फिल्म 
- सपनाची ही फिल्म एक लव्ह स्टोरी आहे. यामध्ये सपनासह अॅक्ट्रेस म्हणून पत्रलेखाही झळकणार आहे. 
- फराज हैदरच्या दिग्दर्शनात तयार होत असलेली ही फिल्म एप्रिल 2018 मध्ये रिलीज होईल.  
- 'नानू की जानू' फिल्म इनबॉक्ट पिक्चर्स प्रोड्यूस करत आहे. 


कोण आहे सपना चौधरी 
- सपना चौधरीचा जन्म 25 सप्टेंबर 1995ला दिल्लीतील महिपालपूर येथे झाला. तिचे प्राथमिक शिक्षण रोहतकमध्ये झाले, येथेच तिचे वडील एका खासगी कंपनीत काम करत होते. 
- 2008 मध्ये वडिलांचे निधन झाले तेव्हा सपना फक्त 12 वर्षांची होती. त्यानंतर आई निलम आणि भाऊ व बहिणीची जबाबदारी सपनाच्या खांद्यावर आली. 
- सपनाने हरियाणामध्ये सिंगिंग आणि डान्सिंग करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आणि हेच आपले करिअर म्हणून निवडले. रागिनी गायिका म्हणून सपनाला आता प्रसिद्धी मिळाली आहे. 
- गाणे आणि डान्स याच्या जोरावरच तिने कुटुंब नुसते सांभाळले नाही तर बहिणीचे लग्नही करुन दिले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फिल्मचे ऑन लोकेशन फोटो...

बातम्या आणखी आहेत...