आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 ऑगस्टला रिलीज होणार परमहंस योगानंद यांच्यावरील 'द आंसर' चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : काही दिवसांपुर्वीच कमलेश पांडेंनी स्पिरिचुअल गुरु ओशो यांच्यावर चित्रपट बनवणार असल्याचे जाहिर केले. यानंतर अशा व्यक्तिमत्त्वांवर चित्रपट तयार होण्याच्या घोषणा होत आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी योग गुरु जग्गी वासुदेव उर्फ  सद्गुरूवर बायोपिक तयार होणार असल्याचे जाहिर झाले. आता यामध्ये परमहंस योगानंद यांचे नावही जोडले गेलेय. ते विसाव्या शकतील आध्यात्मिक गुरु आणि संत होते. त्यांचा जन्म गोरखपुरचा होता. 1920 मध्ये ते अमेरिकेत गेले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे  ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी’ हे खुप प्रसिध्द झाले होते.


विक्टर बॅनर्जी बनले आहेत योगानंद : या चित्रपटाचे नाव 'द आंसर' आहे. परमहंस योगानंतरची भूमिका प्रसिध्द अॅक्टर विक्टर बॅनर्जीने साकारली आहे. याची कथा योगानंद जी यांचे प्रसिध्द भक्त डोनाल्ड वॉल्टर्सच्या आयुष्यावर आधारित आहे. ते यानंतर धर्म आणि नाव बदलून स्वामी क्रियानंद बनले होते. पवन कौल या चित्रपटाचे डायरेक्टर आहे. यापुर्वी त्यांनी ‘श्श्श्श् कोई है’सारखे चित्रपट डायरेक्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...