आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday spl:हिरो बनण्यासाठी मुंबईत आले होते अमरीश पुरी, प्रोड्यूसर म्हणाले - हिरो होण्यासारखा नाही चेहरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूडचे प्रसिध्द 'खलनायक' राहिलेले अमरीश पुरी यांचा आज वाढदिवस आहे. अमरीश पुरी आज या जगात नाहीत, परंतू त्यांच्या कामात ते सदैव जिवंत आहेत. आज ते जिवंत असते तर त्यांनी वयाची 85 वर्षे पुर्ण केली असती. 12 जानेवारी 2005 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अमरीश पुरी हे इतर अभिनेत्यांप्रमाणे हिरो बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. परंतू प्रोड्यूसर्सनी त्यांना नकार दिला होता. ते म्हणाले होती की, तुमचा चेहरा हिरो बनण्यासाठी योग्य नाही. यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये व्हिलेनची भूमिका साकारली. त्यांना आता बॉलिवूडच्या 'खलनायक' मध्ये गणले जाते.


1954 मध्ये झाली होती अमरीश यांची स्क्रीन टेस्ट : अमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी आहेत. ते पहिल्यापासूनच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होते. अमरीशला पहिल्यांदाच मुंबईत बोलावले होते. अमरीश पुरी यांची हिरोसाठी पहिल्यांदा 1954 मध्ये स्क्रीन टेस्ट झाली. परंतू प्रोड्यूसर्सला ते पसंत पडले नाही.


- अमरीश पुरी यांचा मुलगा राजीव पुरीने एका मुलाखतीत सांगितले की, 'पापा तरुण होते तेव्हा हिरो बनण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. परंतू प्रोड्यूसर्सने त्यांचा चेहरा योग्य नसल्याचे सांगितले. यामुळे ते खुप निराश झाले आणि शेवटी त्यांना व्हिलेनच्या भूमिका मिळू लागल्या.'

प्रोड्यूसर्सने नाकारल्यानंतर थिएटरमध्ये पोहोचले अमरीश : त्यांना अॅक्टिंग करण्याची खुप आवड होते. यामुळेच ते प्रोड्यूसर्सने नाकारल्यानंतरही त्यांनी अॅक्टिंग सोडली नाही. ते थिएटरकडे वळाले.


- 1971 मध्ये डायरेक्टर सुखदेवने त्यांना 'रेशमा' आणि 'शेरा'साठी साइन केले. परंतू त्यावेळी त्यांचे वय 40 वर्षे होते. परंतू चित्रपटामध्ये अमरीशला जास्त भूमिका देण्यात आल्या नाही. यामुळे त्यांना आपली ओळख बनवण्यास उशीर लागला.

 - यानंतर श्याम बेनेगलचा चित्रपट 'निशांत', 'मंधन' आणि 'भूमिका' सारख्या चित्रपटांमध्ये काम मिळाले.

 

1980 मध्ये मिळाली ओळख : अमरीश पुरीला खरी ओळख 1980 मध्ये 'हम पांच'मधून मिळाली. या चित्रपटात त्यांनी दुर्योधनची भूमिका साकारली होती. याची खुप चर्चा झाली. यानंतर ते 'विधाता' आणि 'हिरो' सारख्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसले. त्यांच्या भूमिका सुपरहीट ठरल्या.
- 1987 मध्ये आलेल्या 'मिस्टर इंडिया' मध्ये अमरीश पुरी यांनी 'मोगँबो'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांचा 'मोगँबो खुश हुआ' डायलॉग खुप प्रसिध्द झाला. या चित्रपटात व्हिलेनची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने 'राम लखन', 'सौदागर', 'करण-अर्जुन' आणि 'कोयला' सारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले. 


सकारात्मक आणि हास्य भूमिका साकारल्या 
चित्रपटात व्हिलेनची भूमिका साकारण्यासोबतच अमरीश यांनी सकारात्मक आणि हास्य भूमिका साकारल्या. त्यांनी 'गर्दिश' मध्ये पुरुषोत्तम साठे, 'घातक' मध्ये शंभू नाथ आणि 'विरासत' मध्ये राजा ठाकुरच्या भूमिका साकारल्या. 
- यासोबतच 'मुस्कुराहट', 'चाची 420' आमि 'हलचल' सारख्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अमरीश पुरी यांचे 5 प्रसिध्द डायलॉग्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...