आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMC Notice: प्रियांका चोप्राच्या अडचणी वाढल्या, अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेकडून नोटीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. याच दरम्यानत ती एका नव्या अडचणीत अडकली आहे. तिला अनधिकृत बांधकामाप्रकरणी मुंबई महानगर पालिकेनं नोटीस बजावली आहे. अंधेरी पश्चिममधील ओशिवरा येथील एका व्यापारी संकुलात प्रियांकाची जागा आहे. ही जागा तिने भाड्याने दिली आहे. या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आलेय. याच कारणांमुळे पालिकेकडून तिला नोटीस बजावण्यात आली आहे. 

 

स्थानिकांनी केली पालिकेकडे तक्रार
स्थानिक लोकांनी बीएमसीकडे तक्रार केली. त्यांनी सांगितले की, कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये जे स्पा आहेत. तिथे अनधिकृत पध्दतीने बदल करण्यात आले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. अशा प्रकाराची तक्रारी स्थानिकांनी केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यानं या सॅलोनला भेट दिली. अधिकाऱ्यांच्या तपासणीत येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचं समोर आलंय.

 

पालिकेकडून आल्या आहेत दोन नोटिस
प्रियांका चोप्राला पालिकेने दोन नोटिस दिल्या आहेत. कारण पालिका अधिका-यांनी वास्तु प्रिसिंक्ट बिल्डिंगमधील प्रियांकाच्या ऑफिसलाही भेट दिली. प्रियांकाचं कुटुंब या बिल्डिंगमधील जागेचा वापर ऑफिस म्हणून करतात. या ऑफिसमध्येही नियमांचं उल्लंघन करून बांधकाम करण्यात आल्याचं पालिका अधिकाऱ्यांना आढळून आलंय. याच कारणांमुळे प्रियांकाला पालिकेकडून दोन नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. 
-

बातम्या आणखी आहेत...