आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Public Apperiance:धर्मेंद्रचा नातू पहिल्यांदा पब्लिकसमोर, वडील बॉबी ठेवतात लाइमलाइटपासून दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉबी देओलचा मुलगा आर्यमान देओल लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहतो. त्याने पहिल्यांदा वडिलांसोबत पब्लिक अपीयरेंस दिला आहे. 21 वर्षांचा आर्यमान हा वडील बॉबीसोबत IIFA 2018 च्या अवॉर्ड शोमध्ये पोहोचला होता. येथून परत येताना तो एयरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी आर्यमान वडिलांप्रमाणे हँडसम हंक दिसत होता. 


यामुळे मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवतो बॉबी...
- बॉबी देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवण्याविषयी सांगितले होते.
- तो म्हणाला होता, "प्रायव्हसी खुप गरजेची असते. आजकाल पैपराजी कल्चरमुळे हे संपले आहे. माझा मुलगा सध्या शिक्षण घेत आहे."
- "त्याला बॉलिवूडमध्ये यायची इच्छा आहे की, नाही याविषयी मला माहिती नाही. जर तो या क्षेत्रात आला तर मीडिया लाइमलाइटचा नक्कीच वापर करेल."

 

बॉबीची बायको तान्याही लाइमलाइटपासून राहते दूर
- बॉबी देओलने 'रेस 3' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. यासाठी त्याला पत्नी तान्या आणि मुलांनी मोटिवेट केले.
- बॉबीने बिझनेसमनची मुलगी तान्या आहूजासोबत लग्न केले. 30 मे 1996 मध्ये त्याचे लग्न झाले. दोघांना आर्यमान(थोरला) आणि धरम(धाकटा) हे मुलं आहेत.
- तान्याचा 'द गुड अर्थ' च्या नावाने स्वतःचा फर्नीचर आणि इंडीरिअर डेकोरेशनचा बिझनेस आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स आणि बिझनेसमन तिचे क्लाइंट आहेत.
- तान्यानुसार, बॉबी तिच्या कामात जास्त डोक घालत नाही. देओल कुटूंबीय खुप सपोर्टिव्ह आहेत.
- तान्या ग्लॅमरच्या जगतापासून नेहमी दूर राहते. ती बॉलिवूडच्या पार्टीजमध्ये खुप कमी दिसते. परंतू संजय कपूरची पत्नी महीप आणि सोहेल खानची पत्नी सीमा तिच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

 

या चित्रपटांसाठी तान्याने डिझाइन केला कॉस्ट्यूम
- तान्याने 2005 मध्ये आलेल्या 'जुर्म' आणि 2007 मध्ये आलेल्या 'नन्हे जैसलमेर'साठी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते.
- यासोबतच ट्विंकल खन्नाच्या 'व्हाइट विंडो' स्टोरमध्ये तान्याने डिझाइन केलेले फर्नीचर आणि इंटीरिअर डेकोर एक्सेसरीज लागले आहेत.
- तान्या देओलचे वडील देवेंद्र आहूजा 20th सेंचुरी फायनेंस लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.
- यासोबतच ते सेंचुरियन बँकचे प्रमोटर होते. ऑगस्ट 2010 मध्ये हृदयविकाराने त्यांचे निधन झाले होते.
 

बातम्या आणखी आहेत...