आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रेस 3\' पदार्पणाविषयी बोलला बॉबी, \'मी नर्वस नाही, कारण माझ्याकडे गमवायला काहीच उरले नाही\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान आणि बॉबी देओल स्टारर चित्रपट 'रेस 3' 15 जूनला रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉबी देओलच्या करिअरचा कमबॅक चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी बॉबीला आयफा कॉन्फ्रेंसमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्याला विचारण्यात आले की, तु 7 वर्षांनंतर एका मोठ्या चित्रपटातून कमबॅक करतोय, यामुळे तु नर्वस आहेस का? यावर बॉबीने उत्तर दिले की, मी अजिबात नर्वस नाही, कारण माझ्याकडे गमवण्यासाठी काहीच उरलेले नाही. बॉबी म्हणाला - मी अनेक वर्षे काम न करुन खुप काही गमावले आहे. यामुळे मला आता हे करायचे आहे. बॉबी म्हणाला की, मला अवॉर्ड्सऐवजी लोकांचे प्रेम आणि सपोर्ट जास्त महत्त्वाचा आहे.


- बॉबीने मीडियाच्या प्रश्नांची उत्तर देत म्हटले की, मी माझ्या वडिलांना सर्वात जास्त टॅलेंटेड अॅक्टरमधून एक मानतो. परंतू त्यांना कधीच बेस्ट अॅक्टरचा अवॉर्ड देण्यात आला नाही. त्यांना आपल्या चाहत्यांकडून खुप प्रेम आणि प्रशंसा मिळाली. माझ्या चाहत्यांना माझ्याविषयी असेच वाटते. बॉबी देओल 7 वर्षांनंतर यावेळी आयफामध्ये परफॉर्म करणार आहे. रेस 3 बॉलिवूडमध्ये बॉबीचा रीलॉन्च चित्रपटाप्रमाणे आहे. कारण यामध्ये त्याच्या अॅक्शन अवताराची चारही बाजूने स्तूती होत आहे. यासोबतच हा चित्रपट त्याच्या करिअरसाठी माइलस्टोन ठरु शकतो.
बॉबी शेवटच्यावेळी 2017 मध्ये आलेल्या 'पोस्टर बॉइज' चित्रपटात दिसला होता. परंतू हा चित्रपट फ्लॉप ठरला. बॉबीचा शेवटचा हिट चित्रपट 7 वर्षांपुर्वी 2011 मध्ये आलेला 'यमला पगला दीवना' हा होता. यामध्ये त्याचे वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओलने काम केले होते.

 

बातम्या आणखी आहेत...