आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी मोठा भाऊ सनी देओलच्या वस्तू चोरायचा बॉबी, मुलाखतीत केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉबी देओल 15 जूनला रिलीज होत असणा-या 'रेस 3' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'यमला पगला दीवाना'(2011) हा त्याचा शेवटचा हिट चित्रपट होता. यामध्ये तो मोठा भाऊ सनी देओल आणि वडील धर्मेंद्रसोबत प्रमुख भूमिकेत होता. सनी याच्यासोबत त्याची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते. ऐककाळ होता तेव्हा बॉबी सनीच्या वस्तू चोरायचा. स्वतः बॉबीने 2017 मध्ये एका मुलाखती दरम्यान या गोष्टीचा खुलासा केला होता. 


तेव्हा 10वीत होता बॉबी, चोरले होते मोठ्या भावाचे कपडे
- बॉबी देओलने मुलाखतीत सांगितले की, तो 10 वी क्लासमध्ये होते तेव्हा त्याने मोठ्या भावाचे कपडे चोरले होते. बॉबीनुसार, त्याला फेअरवेल पार्टीमध्ये जायचे होते. यासाठी त्याने सनीच्या कपड्यांची चोरी केली होती. तो सनीची ग्रीन डेनिम आणि ग्रीन शर्टसोबत लेदर टाय घालून फेअरवेल पार्टीमध्ये गेला होता. बॉबी म्हणाला की, सनी जवळ बुट खुप चांगले असायचे. पण ते चोरण्याची संधी मला कधीच मिळू शकली नाही. कारण माझा पाय मोठा होता. 
बॉबीने मुलाखतीत सांगितले की, सनी देओलने डीजल कंपनीच्या दोन जीन्स खरेदी केल्या आणि तो अलमारीत ठेवून विसरुन गेला. बरेच दिवस त्या जीन्स अलमारीत होत्या. नंतर बॉबीने त्या जीन्स चोरल्या आणि घालून घेतल्या. बॉबी सांगतो की, सनीला अजुनही लक्षात नाही की, त्याने जीन्स खरेदी केली होती. बॉबीजवळ अजूनही त्या जीन्स आहेत. 


सनीला माहिती होते की, बॉबी त्याच्या वस्तू चोरतो
- या मुलाखतीत बॉबीसोबत सनीही होता. तेव्हा सनीला विचारण्यात आले की, बॉबी तुझ्या वस्तू चोरतो हे तुला माहिती होते की, त्याने उत्तर दिले की, "इट्स ओके लहान भाऊ आहे."

 

बातम्या आणखी आहेत...