आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट चित्रपट देऊनही फ्लॉप ठरली ही अभिनेत्री, राजघराण्यात झालाय जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्री आल्या त्यांनी रुपेरी पडद्यावर काही दिवसच काम केले परंतु आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांना भूरळ घातली. बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीदेखील अशाच सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आज भाग्यश्रीचा 49 वा वाढदिवस आहे. भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969ला शाही पटवर्धन कुटुंबात झाला. तिचे पूर्ण नाव राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन आहे. सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांची ती मुलगी आहे. तिच्या आईचे नाव राजलक्ष्मी आहे. भाग्यश्रीला 2 बहीणी आहेत आणि त्यामध्ये ती सर्वात मोठी आहे.
भाग्यश्रीचे कुटुंब पारंपरिक विचारांचे होते. म्हणून तिला घराबाहेर जास्त वेळ फिरण्याची मुभा नव्हती. कॉलेजच्या दिवसांत संध्याकाळ होण्यापूर्वीच घरात परत यायला हवे, असा तिच्या घरातील नियम होता. बॉलिवूडमध्ये काम करणे सोडल्यानंतर भाग्यश्री आता कुटुंबामध्ये व्यस्त आहे आणि तिच्या पतीला मीडिया कंपनी चावलण्यासाठी हातभार लावते


भाग्यश्रीच्या निर्णयावर कुटुंबीयांचे बंधन
भाग्यश्री अभिनय क्षेत्रात तिचे करिअर तर बनवले, परंतु त्यापूर्वी तिने एम.बी.ए केलेले आहे. याव्यतिरिक्त तिने एल.एल.बीचे पदवी शिक्षणदेखील घेतले आहे. हिंदी, इंग्रजी आणि मराठीव्यतिरिक्त भाग्यश्रीला संस्कृत भाषाचेही ज्ञान अवगत आहे.
 
भाग्यश्रीचे कुटुंबीय खूपच पारंपरिक विचारांचे आहेत. भाग्यश्री तिच्या आयुष्यातील सर्व निर्णय कुटुंबीयांच्या मनाप्रमाणे घेत होती. ती घराच्या बाहेर पडल्यानंतर तिला रात्र होण्याआधी घरात येण्याची सक्त ताकद दिली जायची. व्यस्थापन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भाग्यश्रीने परदेशी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तिच्या नशीबात काही वेगळेच लिहिलेले होते. ती परदेशात जाऊ शकली नाही.


या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भाग्यश्रीविषयीच्या आयुष्यातील काही अशा रंजक गोष्टी ज्या कदाचितच कुणाला माहित असतील. भाग्यश्रीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...