आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग्यश्री म्हणाली, \'निर्लज्ज झाल्या आहेत आजच्या मुली, लाज-लज्जा काय हे त्यांना ठाऊकच नाही\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्री आल्या त्यांनी रुपेरी पडद्यावर काही दिवसच काम केले परंतु आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांना भूरळ घातली. बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीदेखील अशाच सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. लवकरच भाग्यश्री वयाचे 49 वर्ष पुर्ण करणार आहे. भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969ला शाही पटवर्धन कुटुंबात झाला. तिचे पूर्ण नाव राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन आहे. भाग्यश्रीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत. तर तिची मुलगी तिच्यासारखीच ग्लॅमरस आहे. वयाच्या 49 व्या वर्षीही भाग्यश्री आजही तितकीच सुंदर दिसते.

 

हे वक्तव्य करुन आली होती चर्चेत
आजकालच्या मुलींना कोण जाणे काय झाले आहे. मोठ्यांसमोर डोळ्यात डोळे घालून बोलायला त्या मुळीच घाबरत नाहीत. 'याला भेटा, हा माझा बॉयफ्रेंड आहे', असे बिनधास्तपणे बोलताना त्या दिसतात. दोन वर्षांपुर्वी जयपूरमध्ये एका कार्यक्रमात आलेल्या भाग्यश्रीने हे विधान केले होते. 

 

मी आजही मोठ्यांचा आदर करते...
जयपूरमध्ये हेरटेजला प्रमोट करण्यासाठी आलेल्या भाग्यश्रीने एका कार्यक्रमात तिच्या खाजगी आयुष्याविषयी गप्पा मारल्या होत्या. यावेळी ती म्हणाली, ''माझ्या लग्नाला 26 वर्षे झाली आहेत. मात्र जेव्हाही मी माझ्या सासूबाईंच्या शेजारी असते, तेव्हा जर अचानक माझे पती तेथे आले, तर तेथून उठून मी त्यांच्यापासून दूर जाऊन बसते. हाच तर मोठ्यांचा आदर आहे.''

 

माझा निर्णय चुकला, असे वाटत नाही...

'मैंने प्यार किया' या सिनेमानंतर अचानक सिनेसृष्टीपासून दूर जाणे, हा योगायोग नसून विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. भाग्यश्री म्हणते, ''त्यावेळी माझे वय खूप लहान होते. 'मैंने प्यार किया' या सिनेमाचे शूटिंगच्या काळात मी हिमालय (नवरा)च्या प्रेमात पडले होते. लग्नापर्यंत गोष्ट येऊन पोहोचली होती. लग्नानंतर कुटुंब आणि करिअरला एकत्र महत्त्व देणे, जमणार नाही, हे मला कळले होते. त्या निर्णयाचा मला मुळीच पश्चाताप होत नाही. तो त्यावेळी घेतलेला अगदी योग्य निर्णय होता.''

 

पुढील स्लाईडमध्ये वाचा, सलमानविषयी काय म्हणाली होती भाग्यश्री...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...