आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: नेहा धूपियाने शेअर केला बेडवरील फोटो, म्हणाली- आज वर्षातील सर्वात आळशी दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: अभिनेत्री आणि मॉडल नेहा धूपियाने सोशल मीडियावर आपला एक बॅकलेस फोटो शेअर केला आहे. आजचा दिवस सर्वात आळशी आहे असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. फोटोमध्ये ती बेडवर पालथी झोपलेली दिसतेय आणि तिने शॉर्ट ब्लॅक ड्रेस घातला आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, '#mood... i declare today as the laziest day of the year... ok there might be a few more'. हा फोटो तिने ट्विटर आणि इंस्टाग्राम या दोन्हीही अकाउंटवर शेअर केला आहे.

 

अंगद बेदीसोबत केले आहे लग्न
37 वर्षांच्या नेहा धूपियाने 2 वर्षे लहान अभिनेता अंगद बेदीसोबत 10 मे रोजी लग्न केले होते. दोघांचे लग्न प्रायव्हेट सेरेमनीमध्ये झाले. नेहाने स्वतः ट्विट करुन ही माहिती चाहत्यांना दिली होती. तिने लिहिले होते की, "माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय. आज मी माझ्या चांगल्या मित्रासोबत लग्न केले आहे." तर अंगदने लिहिले होते की,  "now Wife!!! Well hello there Mrs BEDI!!! @nehadhupia"

- अंगद हा माजी क्रिकेटर बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे. त्याने  'फालतू' (2011), उंगली (2014), पिंक (2016), डियर जिंदगी (2016), सूरमा (2018) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
- तर नेहाने कयामत से कयामत तक (2003), गरम मसाला (2005), क्या कूल हैं हम (2005), चुप चुपके (2006), शूटआउट अँड लोखंडवाला (2007), दे दना दम (2009), हिन्दी मीडियम (2017), तुम्हारी सुलू (2017), करीब-करीब सिंगल (2017) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नेहा-अंगदच्या लग्नाचे काही फोटोज...

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...