आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांच्या चिमुकलीच्या गँगरेपनंतर हत्या प्रकरणाने बॉलिवूडकर हळहळले, म्हणाले…

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जम्मू काश्मीरमध्ये आठ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराने आता संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सध्याच्या घडीला प्रत्येकाच्याच तोंडी कठुआ #KathuaRape बलात्कार प्रकरणीच्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे. कलाविश्वातूनही बऱ्याच सेलिब्रिटींनी या प्रकरणी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.  अभिनेत्री ऋचा चड्ढाने ट्वीटच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करताना म्हटले, "पुरुष नवरात्रौत्सवात उपवार ठेवतात आणि देवीची पूजा करतात. पण तरीदेखील ते अशा लोकांना पाठिशी घालतात, ज्यांनी मंदिरात एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली."


अभिनेत्री गुल पनाग हिनेदेखील ट्वीट करुन म्हटले, ‘एका पवित्र स्थळी तिच्यावर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली. हो मी हिंदुस्तान आहे आणि आज मलाही लाज वाटतेय.’ 

 

काय आहे प्रकरण?

 

10 जानेवारीला असिफा ही 8 वर्षीय चिमुकली खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीनं अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर असिफाची हत्या केली. शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला असिफाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. 17 जानेवारीला जंगलात असिफाचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली. संजी रामला मदत करणं आणि असिफावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.


पुढे वाचा, काय म्हणाले बॉलिवूड कलाकार... 

बातम्या आणखी आहेत...