आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : आज झालेल्या 65 नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये स्व. श्रीदेवीला सर्वोकृष्ट अभिनेत्री या नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. श्रीदेवींना त्यांचा शेवटचा चित्रपट 'मॉम'(2017) साठी अवॉर्ड देण्यात आला. खुप कमी लोकांना माहिती असेल की, सर्वोकृष्ट अॅक्ट्रेस ठरलेल्या श्रीदेवीला त्यांच्या आईने बालपणीच चित्रपटात आणले होते. सुरुवातीच्या काळात श्रीदेवीला चित्रपटात काम करायचे नव्हते. परंतू त्यांना हे काम करावे लागले. अनेक वर्षांपुर्वी श्रीदेवीने एका फिल्मफेअर मॅगझिनला मुलाखत दिली होती. त्यामध्ये सांगितले होते की, "मी शिक्षणाऐवजी चित्रपटांची निवड केली"
यामुळे श्रीदेवीने केली चित्रपटांची निवड
- या मुलाखतीत श्रीदेवीने सांगितले होते की, "मी एक चांगली विद्यार्थीनी होते. माझ्या पालकांनी मला एकाच वेळी चित्रपट आणि अभ्यासात पाठवले. जेव्हा आम्ही आउटडोर शूटसाठी जायचो तेव्हा टीचर्स मला सपोर्ट करायचे."
- "एका पॉइंटनंतर अशी वेळ आली की, मला शिक्षण आणि चित्रपटामधून एकाची निवड करायचे होती. मी चित्रपटांची निवड केली."
- श्रीअम्मा यंगर अय्यप्पन म्हणजेच श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्यावर्षी साउथ इंडियन चित्रपटांमध्ये एंट्री घेतली होती. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून श्रीदेवीने 'कंदन करुणाई' मध्ये महादेवाची भूमिका साकरली होती. यासोबतच त्यांनी अनेक तेलुगू चित्रपटात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेय.
श्रीदेवीला मिळाले हे अवॉर्ड्स
- श्रीदेवीला 1991 मध्ये 'खुदा गवाह' साठी सिविलियसन अवॉर्ड मिळाला.
- '1990' मध्ये 'चालबाज' आणि 1992 मध्ये 'लम्हे' साठी श्रीदेवीला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.
- 2013 मध्ये श्रीदेवीला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
- यासोबतच श्रीदेवीने साउथ फिल्मफेअर, फिल्म फअर ग्लॅमर अँड स्टाइल, बिग स्टार एन्टटेन्मेंट, तामिळनाडू स्टेट फिल्म, स्टारडस्ट, जीसिनेसोबतच अनेक अवॉर्ड मिळवले...
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, बॉलिवूड डेब्यू दरम्यान श्रीदेवीला बोलता येत नव्हते हिंदी...
*
श्रीदेवीला येत नव्हती हिंदी
- श्रीदेवीने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. 1986 मध्ये आलेल्या 'आखिरी रास्ता' मध्ये रेखाने श्रीदेवीसाठी डबिंग केली होती.
- श्रीदेवी आपल्या काळात 1 कोटी फीस घेणारी एकमेव अभिनेत्री होत्या.
- त्यांनी 'सदमा' (1983), 'चांदनी' (1989), 'गर्जना' (1991), 'क्षणा क्षणम' (तेलुगु 1991) या चित्रपटांमध्ये गाणेही गायले आहेत.
- अनेक लोकांना वाटते की 'जूली' हा श्रीदेवींचा पहिला हिंदी चित्रपट होता. यामध्ये त्यांनी लक्ष्मीच्या लहान बहीणीची भूमिका साकारली होती. परंतू जूलीपुर्वी त्यांचा 'राणी मेरा नाम' हा हिंदी चित्रपट होता. या चित्रपटात श्रीदेवीने हिरोइनच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
*
वडीलांच्या मृत्यूनंतर सुरु ठेवली होती शूटिंग
- श्रीदेवींची मातृभाषा तेलुगु होती. त्यांचे वडील तामिळ होते. 1967 मध्ये 'टुनाईवान' हा श्रीदेवीचा पहिला चित्रपट होता. त्यावेळी त्यांचे वय फक्त 4 वर्षे होते.
- हॉलिवूड फिल्ममेकर स्टीवेन स्पीलबर्गने श्रीदेवीला आपल्या 'जुरासिक पार्क' चित्रपटात कास्ट करण्याचे ठरवले होते. परंतू डेट्समुळे श्रीदेवींना हा चित्रपट करता आला नव्हता.
- 1991 मध्ये श्रीदेवीने यश चोप्राच्या 'लम्हे' शूटिंग दरम्यान वडीलांना गमावले होते. ती अंत्यविधीसाठी भारतात आली. परंतू लंडनला जाऊन तिने पुन्हा शूटिंग सुरु केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.