आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 News: आलिया भट्टने पुर्ण केला कलंकचा शेड्यूल, वाचा बॉलिवूडच्या 5 अपडेट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: आलिया भट्टने 'कलंक' चित्रपटाचे शूटिंग पुर्ण केले आहे. आलियाने शनिवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. यावर तिने कॅप्शन दिले की, '...आणि माझ्यासाठीचे 'कलंक'चे शूटिंग संपले.' यानंतर आलिया 'ब्रम्हास्त्र' चित्रपटावर काम सुरु करतेय. यामध्ये रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन असणार आहेत. 'कलंक' चित्रपट 19 एप्रिलला रिलीज होणार आहे. चित्रपटात आलियासोबतच संजय दत्त, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित नेने आणि आदित्य रॉय कपूरसारख्या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट अभिषेक वर्मन दिग्दर्शित करणार आहेत.

 

यामुळे जखमेनंतरही केली शूटिंग
काही दिवसांपुर्वी आलियाला जखम झाली होती. त्यानंतरही तीने आपला कलंकचा शेड्यूल पुर्ण केला. 

या आहेत बॉलिवूडच्या इतर बातम्या


1. 'अर्जुन पटियाला'ची शूटिंग कम्प्लीट
कृती सेनन आणि दिलजीत दोसांझचा चित्रपट 'अर्जुन पटियाला'ची शूटिंग पुर्ण झाली आहे. अभिनेता वरुण शर्माने चित्रपटाच्या स्टार कास्ट आणि पुर्ण टीमचा फोटो शेअर केला. वरुणने ट्वीटमध्ये लिहिले - "आणि शूटिंग पुर्ण झाली! 'अर्जुन पटियाला' दिलजीत दोसांझ, कृती सेनन, सनी लियोन, मेडडॉक फिल्म, दिनेश विजन टी-सीरीज"
- हा चित्रपट रोहित जुगराज डायरेक्ट करत आहेत. 13 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होईल. चित्रपटात कृती जर्नालिस्ट बनली आहे. तर दिलजीत 'जट अँड जूलिएट 2' नंतर पुन्हा एकदा पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

2. जॉनी लिव्हर म्हणाले 'बॅक टू डॅड' आहे बेस्ट चित्रपट
कॉमेडियन जॉनी लीव्हरने यूथवर तयार झालेला चित्रपट 'बॅक टू डॅड' चित्रपटाची खुप स्तुती केली आहे. जॉनी म्हणाला - "मी आतापर्यंत तरुणांवर तयार झालेले जेवढे चित्रपट बघितले त्यामधील हा सर्वात चांगला चित्रपट आहे. या चित्रपटातून दिलेला संदेश तरुणांनी शिकला पाहिजे. चित्रपटाचे प्रोडक्शन अनूप गडलने आणि डायरेक्शन प्रभात कुमारने केले आहे. या चित्रपटात जोएल नावाच्या एका मुलाची कथा आहे. त्याचा संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे."

 

3. गौरीने शाहरुखला दिली परमिशन 
शाहरुख आणि गौरी खानची लव्हस्टोरी खुप फिल्मी आहे. दोघांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत. तरीही त्यांची बॉन्डिंग आजही स्ट्राँग आणि परफेक्ट आहे. शाहरुख आणि गौरीने नुकताच सोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये शाहरुखने चकीत करणारे कॅप्शन दिलेय. शाहरुखने लिहिले - 'अनेक वर्षांनंतर पत्नीने मला फोटो अपलोड करण्याची परवाणगी दिली आहे.'
- जो फोटो शाहरुखने शेअर केला आहे. त्यामध्ये दोघंही काळा चश्मा घातलेले दिसत आहेत.


4. क्रिकेटवर आधारीत शो करण्याची इच्छा
अभिनेता साहेल फूलला क्रिकेटवर आधारित शो करण्याची इच्छा आहे. कुंडली भाग्य, पिया रंगरेज आणि उतरनसारख्या मालिकांमधून त्याला प्रसिध्दी मिळाली होती. तो म्हणाला की, "मी एक खेळाडू आहे. मला खेळण्याचे वेड आहे. व्हॅकेशनमध्ये किंवा सेटवर रिकामा वेळ भेटल्यास मी क्रिकेट खेळतो. मला क्रिकेटवर आधारित शोमध्ये काम करण्याची इच्छा आहे."
- तो पुढे म्हणाला- "मला विश्वास आहे की, लोकांना हे पाहायला आवडेल. जास्तीत जास्त लोकांना खेळावर प्रेम आहे आणि त्यांना हे आवडेल."

 

 

बातम्या आणखी आहेत...