आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Queen Kangana Gave Special Tributes, Shared Poster At Instagram On The Death Anniversary Of Rani Lakshmibai

राणी लक्ष्मीबाईच्या पुण्यतिथीवर कंगनाने दिले स्पेशल ट्रिब्यूट, शेअर केले पोस्टर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 18 जूनला झांसीची राणी लक्ष्मीबाईची पुण्यतिथी आहे. 1857 च्या युध्दादरम्यान झांसीच्या राणीने इंग्रजांसोबत लढा देताना जीव गमावला होता. कंगना रनोट आपला आगामी चित्रपट मणिकर्णिकामध्ये राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे. लक्ष्मीबाईच्या पुण्यतिथीला कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये कंगनाच्या मणिकर्णिकाच्या लूकचे स्केच बनवलेले आहे. त्याखाली एक संदेश लिहिला आहे - "हीरोईन ऑफ फर्स्ट वॉर ऑफ इंडियन फ्रीडम, ए सिम्बॉल ऑफ पेट्रीयॉटिज्म अँड सेल्फ रिस्पेक्ट" राणी लक्ष्मीबाई


असे दिले होते बलिदान
- इंग्रजांसोबत युध्द केल्यानंतर राणी लक्ष्मीबाई खुप जखमी झाल्या होत्या. कोणत्याही इंग्रजानी त्यांच्या शरीराला हात लावू नये अशी त्यांची इच्छा होती.
- राणींच्या इच्छेनुसार त्यांचे सैनिक त्यांना बाबा गंगादासच्या कुटीमध्ये घेऊन गेले. 18 जून, 1858 ला राणी लक्ष्मीबाइने या कुटीमध्ये अखेरचा श्वास घेतला.

 

ऑगस्टमध्ये रिलीज होणार चित्रपट
- कंगना रनोट मणिकर्णिका चित्रपटाच्या माध्यामातून प्रोडक्शनमध्ये पाऊल ठेवतेय. मणिकर्णिका हा चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज होईल. या चित्रपटात कंगनासोबतच अंकिता लोखंडे, सोनू सूद, अतुल कुलकर्णी, जिस्सू सेनगुप्ता, निहार पंड्या यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
- मणिकर्णिका चित्रपट 200 कोटींपेक्षा जास्त बजेटमध्ये तयार होत आहे. लीड अॅक्ट्रेस कंगनाने स्वतः या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये फीस घेतली आहे.

 

अनेक वादही आहेत
- पद्मावत चित्रपटाचा विरोध करणा-या करणी सेना आणि सर्व ब्राम्हण महासभेने या कथेचा विरोध केला होता. आणि कथा सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. चित्रपटाची कथा बाहुबलीचे लेखक के विजयेंद्र प्रसादने लिहिली आहे.
- फिल्म मेकर केतन मेहताने कंगनावर मणिकर्णिकाची स्टोरी आयडिया चोरल्याचा आरोप लावला आहे. केतन म्हणाला होता की - चित्रपटाच्या स्टोरीसाठी त्यांनी कंगनाला अप्रोच केले होते. परंतू कंगनाने नंतर एका दूस-या प्रोड्यूसरसोबत मिळून चित्रपटाची शूटिंग सुरु केली. 


येणार अजून एक चित्रपट 
- कंगनाच्या चित्रपटापुर्वी राणी लक्ष्मीबाईवर बनलेला अजून एक चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटाचे नाव 'सॉर्ड आणि स्कप्ट्रेस' आहे. हा एक इंडोंब्रिटिश चित्रपट आहे आणि स्वाती भिसेने डायरेक्टर केला आहे.
- हा चित्रपट मार्चमध्ये रिलीज होणार असे वृत्त होते. स्वाती म्हणाली की, एडिटर्सला फेब्रुवारीपर्यंत डेडलाइन मिळाली आहे आणि त्यानंतर चित्रपट रिलीज केला जाईल. अजून दोन्हीही चित्रपट रिलीज झालेले नाहीत.


एक्स्ट्रा शॉट्स
- चित्रपटाचे दिग्दर्शन कृष करत आहेत. कृषने यापुर्वी गब्बर इज बॅक चित्रपट डायरेक्ट केला होता.
- राणी लक्ष्मीबाई यांच्यावर सुभद्राकुमारी चौहान यांनी खूब लडी मर्दानी ही कविता लिहिली होती. ही कवीता अनेक क्लासेसच्या सेलॅबसमध्ये शिकवण्यात आली आहे. 
- राणी लक्ष्मीबाईंवर लिहिलेल्या 'राणी' या पुस्तकात रॉबर्ट एलिससोबतच्या राणीच्या प्रेम प्रसंगाविषयी लहिले होते. ज्यामुळे लेखिका जयश्री मिश्राला विरोधाचा सामना करावा लागला होता. पुस्तकावरही बंदी घालण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...