आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर प्रथमच पोलीस इवेंटमध्ये खुशीत दिसली अनुष्का शर्मा, मलायका-शाहरुखचा धमाल परफॉर्मन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खास मुंबई पोलिसांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम उमंगमध्ये अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली. अभिनेत्री अनुष्का शर्माने लग्नानंतरच प्रथमच इवेंट अटेंड केला. यावेळी काही कलाकारांनी धम्माल परफॉर्मन्स देत उपस्थितांचे मनोरंजन केले. या कलाकारांमध्ये शाहरुख खान, मलायका अरोरा, रणवीर सिंह, कृती सेनन, निधी अग्रवाल यांचा समावेश आहे. तर अनिल कपूर आणि अर्जून कपूर यांनी 'राम-लखन'मधील 'माय नेम इज लखन..'वर डान्स करत सर्वांना खूश केले. आलिया भट्टने तेरे बिन गुजारा ऐ दिल है मुश्किल...' हे गाणे म्हटले. अक्षय कुमार, सुनील ग्रोवर, मनीष पॉल यांनी त्यांच्या कॉमेडीने सर्वांना फार हसवले. 

 

रविना टंडनने ट्वीटरवर फोटो शेअर करत कॅप्शन दिले, '#umang in gratitude to thank the @MumbaiPolice for all the help protection and their untiring service !🙏🏻🙏🏻 #salute to #mumbaipolice'. मुंबई पोलिसांनीही ट्वीटरवर या कार्यक्रमाचे बरेच फोटो शेअर केले आहेत. अनेक सेलिब्रेटींची होती उपस्थिती...

 

उमंग 2018च्या कार्यक्रमात दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, कंगला रनोट, अमिताभ बच्चन, नीतू चंद्रा, सोफी चौधरी, श्रीदेवी, बोनी कपूर, आमिर खान, करन जौहर, कुणाल खेमू, जॉनी लिवरसह अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. यावेळी दीपिका पादुकोणने मुंबई पोलिसांना धन्यवाद दिले. यावेळी अमिताभ बच्चन यांनी मुंबई पोलीस कॅलेंडर लॉन्च केले. आयोजनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. 

 

 पुढच्या स्लाईडवर पाहा, उमंग 2018 इवेंटचे फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...