Home | News | Bollywood Stars Who Dared To Bare On Screen

'बागी 2' मध्ये नेकेड दिसला टायगर, हे अभिनेतेही ऑनस्क्रीन झालेय निर्वस्त्र

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 23, 2018, 12:00 AM IST

टायगर श्रॉफचा अपकमिंग चित्रपट 'बागी 2' चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटात एकीकडे टायगर श्रॉफच्या अॅक्शन पाहायला

 • Bollywood Stars Who Dared To Bare On Screen

  मुंबई : टायगर श्रॉफचा अपकमिंग चित्रपट 'बागी 2' चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटात एकीकडे टायगर श्रॉफच्या अॅक्शन पाहायला मिळतात. तर दूसरीकडे तो एका सीनमध्ये आपले पुर्ण कपडे उतरवतानाही दिसतो. एका सीनमध्ये टायगरला जेलमध्ये टॉर्च केले जात आहे. हा सीन शूट करताना टायगर नेकेड झालाय हे स्पष्ट दिसतेय. आमिरपासून जॉनपर्यंत हे झाले आहेत नेकेड...


  चित्रपटांमध्ये नेकेड सीन देणारा टायगर हा पहिला अभिनेता नाही. यापुर्वीही अनेक अभिनेत्यांनी असे काम केलेय. यामध्ये आमिर खान, जॉन अब्राहम, नील नितिन मुकेश आणि राजकुमार रावसारख्या अभिनेत्यांचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच काही अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत.


  आमिर खान
  चित्रपट : पीके

  आमिर खान 'पीके' चित्रपटासाठी स्क्रिनवर विना कपड्यांचा दिसला आहे. या चित्रपटात त्याच्या अंगावर फक्त एक रेडियो असतो. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही आमिर खान नेकेड लुकमध्ये दिसला होता. 2014 मध्ये आलेला चित्रपटातील आमिरचा हा अवतार खुप बोल्ड स्टेप मानली गेली होती. या चित्रपटात त्याने एलियनची भूमिका साकारली होती.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, ऑनस्क्रीन नेकेड झालेल्या अशाच काही अभिनेत्यांविषयी...


  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Bollywood Stars Who Dared To Bare On Screen

  जॉन अब्राहम
  'न्यूयॉर्क' या कबीर खानच्या चित्रपटात जॉन अब्राहम नेकेड झाला होता. या चित्रपटात त्याने समीर शेख नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या एका सीनमध्ये पोलिस जॉनचे सर्व कपडे काढून त्याची विचारपुस करतात. हा चित्रपट 9/11 घटनेवर आधारित आहे.
   

 • Bollywood Stars Who Dared To Bare On Screen

  नील नितिन मुकेश
  डायरेक्टर मधुर भंडारकर यांच्या 'जेल' चित्रपटात अभिनेता नील नितिन मुकेशसुध्दा नेकेड अवतारात दिसला होता. या चित्रपटात जेलच्या एका सीनमध्ये तो विना कपड्यांचा दिसला होता. परंतू हा चित्रपट यशस्वी झाला नाही.

   

 • Bollywood Stars Who Dared To Bare On Screen

  राजकुमार राव 
  'बरेली की बर्फी' मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मन जिंकणा-या राजकुमार रावने हंसल मेहताच्या 'शाहिद' चित्रपटात नेकेड सीन दिला होता. या चित्रपटात पोलिस त्याचे कपडे काढून विचारपूस करतात. या चित्रपटासाठी त्याला नॅशनल अवॉर्डही मिळाला आहे.
   

Trending