आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध अभिनेते नरेंद्र झा यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने मालवली प्राणज्योत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2018 या वर्षाची सुरुवात बॉलिवूडसाठी अतिशय वेदनादायी ठरली आहे. वर्षाची सुरुवात होताच अनेक मोठे कलाकार या जगातून कायमचे निघून गेले आहेत. श्रीदेवी आणि शम्मी आंटी यांच्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेते नरेंद्र झा यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. ते 55 वर्षांचे होते. आज (14 मार्च) पहाटे पाच वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नरेंद्र झा यांची प्राणज्योत मालवली. वाडा येथील फार्म हाऊसवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी ते त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते. यापूर्वी त्यांना दोनवेळा ह्रदयविकाराचा झटका आला होता.

  

नरेंद्र झा यांनी विविध शेड असलेल्या भूमिका साकारल्या. 70हून अधिक मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. 'शांति', 'छूना है आसमान', 'एक घर बनाऊंगा' या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. तर 'अधूरी कहानी', 'घायल वन्स अगेन', मोहनजो दाडो', 'शोरगुल', 'काबिल', 'हैदर', 'रईस' यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. 2015 मध्ये नरेंद्र झा यांनी सेन्सॉर बोर्डाच्या माजी सीईओ पंकजा ठाकूर यांच्याशी लग्न केले होते.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, नरेंद्र झा यांची आठवणीतील छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...