आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या फॅनने आपल्या कारवर लावले त्यांचे पोस्टर, पाहून भावूक झाले बोनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्यामध्ये नाहीत. परंतू अजूनही त्यांचे फॅन्स कमी झालेले नाहीत. पुण्याची फोटोग्राफर टोनू सोजतिया श्रीदेवीची डायहार्ट फॅन आहे. टोनूच्या कारवर श्रीदेवीचे पोस्टर लावलेले आहेत. ती रविवारी पुण्यातून मुंबईमध्ये श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांना भेटायला आली. श्रीदेवीची ती किती मोठी फॅन आहे हे सांगण्यासाठी टोनू या सुपरस्टारच्या पतीला भेटायला आली होती. एवढेच नाही तर बोनीलासुध्दा आपल्या बायकोच्या फॅनला पाहायचे होते. जेव्हा श्रीदेवीची फॅन बोनी यांना भेटायला आली, तेव्हा बोनी जराही उशीर न करता तिला भेटले. टोनूने बोनी यांना भेटण्याची वेळ मागितली होती.

 

ऑफिसमध्ये भेटले बोनी
बोनी यांनी आपल्या ऑफिसमध्ये टोनू यांची भेट घेतली. यासोबतच श्रीदेवीच्या आठवणी शेअर केल्या. श्रीदेवीच्या आठवणी ताज्या झाल्यामुळे बोनी इमोशनल झाले. टोनूने बोनी यांना 'सोलवा सावन' मधील श्रीदेवीचा एक फोटो गिफ्ट केला. टोनूची भेट घेतल्यानंतर बोनी कपूर कार पाहण्यासाठी ऑफिसच्या बाहेर आले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा टोनू सोजतियाची कार, यावर लावले आहेत श्रीदेवीचे पोस्टर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...