आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोनी यांनी हरिद्वारमध्ये केले श्रीदेवींच्या अस्थींचे विसर्जन, 16 व्या दिवशी होणार प्रेअर मीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई/हरिद्वारः श्रीदेवी यांच्या अस्थींचे रामेश्वरम येथे विसर्जन केल्यानंतर बोनी कपूर कुटुंबीयांसोबत गुरुवारी हरिद्वारला गेले होते. येथील व्हीआयपी घाटावर त्यांनी शांतीपाठ  केला. शिवाय येथे श्रीदेवींचे अस्थिपुष्प विसर्जित केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे धाकटे भाऊ अनिल कपूर, अमर सिंह आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा उपस्थित होते. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडाल्याने श्रीदेवी यांचे निधन झाले होते. श्रीदेवी यांच्या निधनानंतर सोळाव्या दिवशी त्यांच्या होमटाऊन चेन्नई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. 


28 फेब्रुवारी रोजी मुंबईत झाले होते अंत्यसंस्कार...
- निधनानंतर 27 फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांचे पार्थिव शरीर मुंबईत आणण्यात आले होते. 28 फेब्रुवारी रोजी राजकिय इतमामात श्रीदेवी यांच्यावर अंत्यविधी करण्यात आल्या होत्या.
- 3 मार्च रोजी बोनी आणि त्यांच्या दोन्ही लेकी जान्हवी आणि खुशी यांनी रामेश्वरम येथे श्रीदेवी यांच्या अस्थींचे विसर्जन केले होते. 

 

आईविना साजरा झाला जान्हवीचा वाढदिवस... 
श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवीचा 6 मार्च रोजी 21 वा वाढदिवस झाला. जान्हवीचा हा पहिला असा वाढदिवस होता, जेव्हा तिची आई श्रीदेवी तिच्यासोबत नव्हती. आईच्या इच्छेनुसार जान्हवीने तिचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा केला.


पुढील स्लाईड्सवर बघा, हरिद्वार येथील बोनी कपूर यांची छायाचित्रे.... 

बातम्या आणखी आहेत...