आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एन्टटेन्मेंट डेस्क : सिंगिंग-डान्सिंग सेंसेशन आणि बिग बॉस 11 ची कंटेस्टेंट सपना चौधरीला सोशल मीडियावर एका तरुणाने शिव्या दिल्या. जम्मूमध्ये झालेल्या रसाना कांडमध्ये एका समुदायाला बदनाम केल्यामुळे हा तरुण रागात होता. याच कारणांमुळे सपनाच्या ट्वीटर अकाउंटवर त्याने शिव्या दिल्या. एवढेच नाही तर सपनाविरुध्द त्याने अनेक अपमानकारक गोष्टी लिहिल्या. यावर सपनाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संभल पोलिस आणि डीजीपीकडे तक्रार केली. तिने ट्वीटवर सर्वांना टॅक करुन ही तक्रार केली. तिने लिहिले की, "या मुलावर कारवाई करा. हा मुलगा वाईट-वाईट शिव्या लिहलतोय. सपनाने पोलिसांकडे तक्रार करताच हा तरुण सपनाची माफी मागू लागला."
- त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, "सॉरी मॅडम मला वाटले हे अकाउंट फेक आहे, मी खुप गरीब आहे. मी तुमचे पाय पडण्यास तयार आहे. ज्या अकाउंटवरुन ट्वीट केले गेले, त्याचे नाव 'एके खान कोबरा' आहे. हा युवक संभल येथील आहे. सपनाने तक्रार केल्यावर पोलिसांनी लवकरच अॅक्शन घेतली. आयजी मुरादाबाद आणि संभलच्या एसपीने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यासोतबच तपासनी करण्याचे आश्वासन दिलेय. या तरुणाला लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.