आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा फेकणा-यावर चिडल्याप्रकरणी अनुष्का-विराटच्या सपोर्टमध्ये आले केंद्रीय मंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : क्रेंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू अनुष्का आणि विराट कोहलीच्या समर्थनात समोर आले आहे. अनुष्का काही दिवसांपुर्वीच अरहान नावाच्या एका व्यक्तीने रस्त्यावर बॉटल फेकल्यामुळे त्याच्यावर ओरडली होती. अनुष्का त्याच्यावर रागावत असताना विराटने तिचा व्हिडिओ केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अरहान आणि त्याची आई अनुष्का-विराटवर टिका करत आहे. सोशल मीडियार यूजर्समधील काही लोक म्हणाले की, हा अनुष्का आणि विराटचा पब्लिसिटी स्टंट आहे. परंतू आता रिजिजूने अनुष्का-विराटला सपोर्ट करत कचरा फेकणा-या अरहानला फटकारले आहे. 


काय बोलले किरण रिजिजू...
- किरण जिजिजू यांनी ट्वीट करत लिहिले - अनुष्का-विराटला खरच पब्लिसिटीची गरज आहे? त्यांना तर स्वतःला प्रायव्हसी हवी असेल. नागरिक भावना ही सामाजिक नैतिकता आहे आणि नैतिक व्यवहार हे पैशातून आणि शिक्षणातून येत नाही. आपण भारताला स्वच्छ ठेवायला हवे. #SwachhBharat
- याच काळात फिल्म मेकर करण जोहरनेही अनुष्काला सपोर्ट करत लिहिले - This is the order of the day!! Well done @AnushkaSharma !!


अरहान आणि त्याच्या आईने अनुष्का-विराटला दिले होते उत्तर
या प्रकरणी अहरान आणि त्याची आई गीतांजलीने अनुष्का-विराटला फटकारले होते. अरहानने फेसबुकवर लिहिले होते - माझ्याकडून प्लास्टिकची बॉटल चुकून रस्त्यावर पडली. ज्यामुळे अनुष्काने माझ्यावर ओरडणे सुरु केले. मी तिची माफीही मागितली, परंतू तिने माझे ऐकले नाही. माझ्या कारमधून चुकून कचरा पडला होता. पण त्यापेक्षा जास्त तर अनुष्काच्या तोंडातून पडला. त्यांनी त्याच्या पर्सनल फायद्यासाठी याचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर पोस्ट केला यामुळे मी हैराण आहे.


- तर अहरानची आई गीतांजलीने लिहिले - 'अनुष्का आणि विराटने तो व्हिडिओ पोस्ट करुन माझ्या मुलाला संपुर्ण जगासमोर लाजिरवाणे केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याचा चेहराही ब्लर केलेला नाही. या लोकांनी आपले फॅन्स वाढवण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. एखाद्याची इमेज खराब करण्याची यांची हिंमत कशी झाली.'


काय म्हणाली अनुष्का शर्मा
विराटने जो व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये अनुष्का कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला बॉटल फेकल्यामुळे झापताना दिसत आहे. ती आपल्या कारची काच वर करत त्याला म्हणते की, तुम्ही रस्त्यावर प्लास्टिक कसे फेकू शकता. यानंतर डस्टबिनचा वापर करत जा.

बातम्या आणखी आहेत...