आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सदमातील \'लोरी\'ची भिती वाटतेय - कमल; श्रीदेवीच्या निधनाने बॉलिवूड हळहळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नाही. वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिची प्राणज्योत मावळली. भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी कुटुंबीयांसोबत दुबईत होती. श्रीदेवीच्या निधनाने अवघे बॉलिवूड हळहळले आहे. कलाकारांनी ट्वीटरच्या माध्यमातून बॉलिवूड स्टार्सनी श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीच्या निधनावर म्हटले, "ठाऊक नाही, पण विचित्र बैचेनी पसरली आहे."  तर 'सदमा' या चित्रपटातील श्रीदेवीचे को-स्टार कमल हसन यांनी ट्वीटवर लिहिले, "आता सदमातील 'लोरी'ची भिती वाटतेय." 

 

- तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुढे तिच्या ट्वीटमध्ये म्हणाली, "काय म्हणू.. श्रद्धांजली.. आम्ही सगळेच श्रीदेवीवर प्रेम करायचो. काळा दिवस, RIP"


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूड कलाकार काय म्हणाले...  

बातम्या आणखी आहेत...