आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कास्टिंग काउचच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सरोज खान यांचा माफिनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जेष्ठ नृत्यूदिग्दर्शिका सरोज खान यांनी कास्टिंग काउच संदर्भात एक वादग्रस्त विधान केले होते. सांगलीमध्ये फ्यूजन डान्स अकॅडमीकडून एक दिवसीय डान्स प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरोज खान उपस्थित होत्या. त्यांना बॉलिवूडमध्ये होणा-या कास्टिंग काउचविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

 

सरोज खान यांचा माफीनामा
- सरोज खान यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात होती. त्यांच्या या विधानाचा विरोध केला जात होता. 
- आपल्या या विधानावर सरोज खान यांनी माफीही मागितली आहे. मला खेद आहे, मी माफी मागते, असं त्यांनी म्हटलं.


काय बोलल्या सरोज खान?
- सरोज म्हणाल्या की, कास्टिंग काउच इंडस्ट्रीसाठी काही नवीन गोष्ट नाही. हे तर बाबा आदमच्या जमान्यापासून सुरु आहे. इंडस्ट्रीमध्ये दुष्कर्म केल्यानंतर मुलींना सोडून दिले जात नाही. त्यांना काम आणि रोजी-रोटी मिळते.
- सरोज खान येथेच थांबल्या नाहीत. त्यांनी सरकारी कर्मचा-यांवरही निशाना साधलाय. अनेक सरकारी लोक मुलींवर हात साफ करुन घेतात. असे त्या म्हणाल्या.
- सरोज खानला एका न्यूज चॅनलच्या शोमध्ये गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काउचविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा सरोज खान यांनी असे वक्तव्य केले होते.

 

सोशल मिडियाव उमटल्या होत्या तीव्र प्रतिक्रिया

- सरोज खान व्दारे कास्टिंग काउचवर केलेल्या व्यक्तव्यावर लोक सोशल मीडियावर नाजारी व्यक्त करत आहेत.
- एका यूजरने लिहिले, "अशिक्षित महिलेकडून कसे उत्तर असेल?"
- तर एका यूजरने लिहिले की, 'जिथून आपण शिकतो, पाहा तिथले लोक काय विचार करतात.'
- तर एका यूजरने लिहिले की, 'काही लोक रोज नवे तर्क लावतात, रेप का योग्य आहे?'
- तर सरोज खानच्या एका फॅनने लिहिले की, 'मी तुमचा फॅन आहे, माझ्या मनात तुमच्यासाठी खुप सन्मान आहे. परंतू हे व्यक्तव्य लाजिरवाने आहे.'

बातम्या आणखी आहेत...