आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्राम भालेरावच्या रुपात दिसणार \'सिम्बा\' रणवीर सिंह तर सारा अली खानने मराठीत केला हा प्रश्न!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क - रोहीत शेट्टी आणि करण जोहर यांचा कम्बाईन प्रोजेक्ट असलेला 'सिम्बा' या चित्रपटाचे शूटिंग ६ जूनपासून सुरु झाले आहे. चित्रपटाच्या शूटिंगबाबत करण जोहरने इन्सटाग्रामवर माहिती दिली आहे. शूटिंगच्या काही तासांनंतरच करणने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात सारा अली खान, रोहीत शेट्टी आणि रणवीर सिंग सेटवर मस्ती करताना दिसत आहे. 
 
 अशी आहे सिम्बाची कथा...
 - 2015 साली आलेला तेलुगू चित्रपट टेमपरचा हा रिेमेक आहे. हा चित्रपट द्या नावाच्या ऑफिसरची गोष्ट आहे जो स्मगलरशी हातमिळवणी करुन वर्दीचा उपयोग चुकीच्या कामांसाठी करतो आणि अवैध पद्धतीने पैसे कमावतो. 
 - टेम्पर या चित्रपटात जूनिअर एनटीआरचा टपोरी अंदाज पोलिसांना पाहायला मिळत आहे जो पैशांसाठी काहीही करु शकतो. 
 - या चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल दोन महिन्यांचे आहे जे हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे सुरु झाले आहे. चित्रपटात रणवीरचा अंदाज आपल्याला सिंघमची आठवण करुन देतो. 
- रणवीरने यावेळी मराठी पोलीसाची भूमिका केली आहे आणि त्याच्या भूमिकेचे नाव संग्राम भालेराव आहे. यावेळी तो - - -चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसला आहे तो म्हणतो, 'जो देतो त्रास, त्याचा मी घेतो क्लास'. यावर रोहीत शेट्टी त्याला चित्रपटाचा डायलॉग बोलल्याबद्दल रागावतो तर सारा अली खानही या व्हिडिओमध्ये मराठी बोलताना दिसत आहे. 
 - २८ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रणवीर-सारा आणि रोहीत शेट्टीचा हा व्हिडिओ आणि सेटवरील काही खास फोटोज्...

 

बातम्या आणखी आहेत...