आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिया प्रकाशच्या गीतावरून एफआयआर;मुस्लिम भावना दुखावल्या गेल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

  

हैदराबाद- अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियार हिच्या नेत्रकटाक्षामुळे चर्चेतील मल्याळम चित्रपट ‘ओरू अदार लव्ह’च्या दिग्दर्शकावर हैदराबादेत एफआयआर दाखल झाला आहे. ‘मनिकया मलराया पुवी...’  या गीतामुळे मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.


व्यावसायिक जहीर अली खान, अभियांत्रिकीचा विद्यार्थी मुकीथ खान आणि इतरांच्या फिर्यादीनुसार ओमर लुलू लिखित गीतात मोहंमद पैगंबर यांच्या पत्नीचा आक्षेपार्ह पद्धतीने उल्लेख केला आहे. हे गीत काढून टाकावे किंवा त्यातील शब्द बदलावेत, अशी त्यांची मागणी आहे. अभिनेता व अभिनेत्रीबद्दल आपल्याला आक्षेप नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एसीपी एईद फय्याज म्हणले, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी मुस्लिम विद्वानांचे मत जाणून घेतले जाईल. 

 

...उलट स्तुतीच
हे गीत इस्लामविरोधी नाही. उलट यात मोहंमद साहब यांची स्तुती आहे. हे एक पारंपरिक मुस्लिम गीत आहे. व्हिडिओत काही मोजकी दृश्ये असल्याने ते रोमँटिक असल्याचा अाभास निर्माण होत आहे.
- ओमर लुलू, दिग्दर्शक

 

गाण्याचे इंग्रजी भाषांतर... 
A woman like the pearl flower
Her highness Khadeja Beebi
In the holy city of Macca
She lived like a Queen

Asked Khathimun Nabi
Sent as in charge of trade
At the first sight of him
She desired him

After completing the expedition
Blessed Rasulullah came back
To marry the Prophet
was the Bibi desire


कटाक्ष नजरेने केले तरुणाईला घायाळ... 
प्रिया अगदी काहीच दिवसांमध्ये सोशल मीडियाची सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी झाली आहे. व्हॅलेंटाइन वीकदरम्यान तिच्या ‘मनिक्य मलरया पूवी’ गाण्यातील एक छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये प्रिया तिच्या शाळकरी मित्राला नजरेच्या हावभावांनी प्रेम व्यक्त करताना दिसते. तिच्या याच हावभावांनी अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. या गाण्याला आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी बघितले आहे. ट्विटरवर प्रियाचे नाव टॉप ट्रेंडमध्ये आले आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, प्रियाचे काही फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...